परफेक्ट डाएट अन् 13 किलो वजन कमी! फिटनेस कोचच्या डाएट प्लॅनची सर्वत्र चर्चा
आजच्या धावपळीच्या जीवनात शरिराला तंदुरुस्त ठेवणे म्हणजे एक आव्हानच आहे. मात्र, कामाचा कितीही बोजा असला तरी काहीजण प्रकृतीची व्यवस्थित काळजी घेतात. असंच एक उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. अलिकडेच, एका व्यक्तिने डाएट आणि फिटनेस कोचच्या मदतीने 13.5 किलो वजन कमी केले आणि पोटाची चरबी कमी केली. त्याची कहाणी सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
फिटनेस कोच प्रियांका लाहिरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया पेजवर एक फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. एका व्यक्तीने त्याचा आहार सुधारण्यासाठी, शरीरातील चरबी कमी करण्यासाठी, ताकद वाढवण्यासाठी आणि धावण्याची क्षमता सुधारण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला. यानंतर माझ्या पद्धतीने योग्य आहार आणि व्यायाम करून त्याने तब्बल 13.5 किलो वजन कमी केले आहे. हा प्रवास सोपा नव्हता, असे त्यांनी म्हटले.
My mentee approached me to improve his diet, reduce body fat, gain strength and improve his running capacity
And in the process of his journey, he lost 13.5kg body weight and whole of his belly fat.
But how did he get to this situation where he needed intervention?
Let me… pic.twitter.com/s7gOtj63ja
— Priyanka Lahiri (@PriyankaLahiri_) March 26, 2025
शरिराचे वजन वाढण्यामागे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे तुमचे कामाचे ठिकाण (Office) असते. माझ्या क्लाईंटसोबतही तेच झालं. कामाच्या ठिकाणी बराच वेळ बसून राहणे, जंक फूड आणि कॅलरीजचे सेवन वाढले, कामाचा ताण, एकाच ठिकाणी बसून राहणे या सगळ्या गोष्टींमुळे वजन वाढले होते. त्याच्या ऑफिसचे कॅन्टिंनमध्ये चॉकलेटपासून ते उच्च कॅलरिचे स्नॅक्स उपलब्ध होते. आणि आपण एकदा इतक्या सगळ्या चविष्ट गोष्टींच्या प्रेमात पडलो की यातून बाहेर पडणे कठीण असते. माझ्या क्लाईंटसोबतही हेच झाले. त्यामुळे त्याने माझ्याशी संपर्क साधला, असे त्या म्हणाल्या.
कोणालाही वजन कमी करायचे असेल तर त्यासाठी एक डाएट प्लॅन करावा लागतो. माझ्या क्लाईंटसाठी देखील मी एक डाएट प्लॅन तयार केला. मी त्याला त्याच्या ऑफिस कँटिनमध्ये उपलब्ध असलेल्या गोष्टींवर आधारित एक कस्टमाइज्ड डाएट प्लॅन दिला. आणि त्याने देखील हे डाएट फॉलो केले. यानंतर मी त्याचा 5 दिवसांचा व्यायाम प्लॅन बनवला. ज्यामध्ये 4 दिवस ताकद, 1 दिवस सहनशक्ती, चपळता वाढवण्यावर भर दिला. तर पुढील दोन दिवस हे आऊटडोअर एक्सरसाईजसाठी दिले, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षावर केला आहे.
What changed under my programme?
I gave him a customised diet plan based on what was available in his office cafeteria. He just needed to make the right choices, which he did wonderfully
I created his 5 day exercise plan that targeted 4 days of strength, 1 day of endurance,… pic.twitter.com/963HglODwv
— Priyanka Lahiri (@PriyankaLahiri_) March 26, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List