सरपंचपदाच्या आरक्षणासाठी ईश्वरी चिठ्ठया काढणार, अहिल्यानगरमध्ये तालुकानिहाय कार्यवाही सुरु

सरपंचपदाच्या आरक्षणासाठी ईश्वरी चिठ्ठया काढणार, अहिल्यानगरमध्ये तालुकानिहाय कार्यवाही सुरु

ग्रामपंचायतीची आगामी पंचवार्षिक निवडणूक होणार असून, यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील एक हजार 223 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण ग्रामविकास विभागाने 5 मार्च रोजी निश्चित केले आहे. यानुसार तालुकानिहाय आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असून, प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी लवकरच ईश्वरी चिठ्ठया काढण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील एक हजार 223 ग्रामपंचायतींपैकी 624 ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे. यात 312 ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती येणार आहे. 330 ग्रामपंचायतींमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी सरपंचपद आरक्षित राहणार असून, यात 165 महिलांना संधी मिळणार आहे, तर 119 ठिकाणी अनुसूचित जमातीसाठी आरक्षण राहणार असून, 60 ग्रामपंचायतींमध्ये ‘महिलाराज’ असणार आहे. तसेच 150 ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षण राहणार असून, यात 75 महिला सरपंचांना संधी असणार आहे.

पुढील पाच वर्षांचे सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामविकास विभागाला प्रवर्गनिहाय टक्केवारी आणि लोकसंख्येचा अहवाल फेब्रुवारी महिन्यात सादर केला होता. 2011च्या जनगणनेनुसार सादर केलेल्या अहवालात जिल्ह्यात 36 लाख 53 हजार 339 ग्रामीण लोकसंख्या असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. यात 8 लाख 27 हजार 150 ओबीसींची लोकसंख्या असून, त्यांची एकूण लोकसंख्येशी टक्केवारी 22.64 इतकी आहे. तसेच अनुसूचित जातीची 4 लाख 47 हजार 695 इतकी लोकसंख्या असून, त्यांची टक्केवारी 12.25 आहे. तर, 3 लाख 55 हजार 374 अनुसूचित जमातीची लोकसंख्या असून, त्याची टक्केवारी 9.73 टक्के असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सात ग्रामपंचायतींच्या आरक्षणात सुधारणा

अहिल्यानगर जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींच्या सात जागांसाठी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने आरक्षणात सुधारणा करण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गातील या ७जागांचा समावेश सर्वसाधारण प्रवर्गात करण्यात आला आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ, शिबलापूर, वडगाव पान, नगर तालुक्यातील हमीदपूर, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर, पाथर्डी तालुक्यातील भिलवडे, शेवगाव तालुक्यातील आव्हाणे खुर्द येथील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आधी सिलेंडर फुटला, मग फटाक्यांचा स्फोट; 7 जणांचा मृत्यू; काही जण जखमी आधी सिलेंडर फुटला, मग फटाक्यांचा स्फोट; 7 जणांचा मृत्यू; काही जण जखमी
सिलेंडर फुटल्याने घरातील फटाक्यांचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीत सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी...
Aircraft Crashes In Gujarat – गुजरातमध्ये खाजगी विमान कोसळलं, महिला प्रशिक्षणार्थी पायलट जखमी
MI vs KKR – मुंबईने उघडलं विजयाचं खातं, कोलकात्याचा 8 विकेट्सने केला पराभव
भाजपच्या जागा वाढवण्यासाठी मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा घाट? जाणून घ्या का होतोय दक्षिणेकडीस राज्यातून विरोध
Night landing at Shirdi Airport : साई भक्तांसाठी आनंदाची बातमी, काकड आरतीला पोहचणे झाले सोपे, शिर्डी एअरपोर्टवर नाईट लॅडींगची सुविधा
‘तेव्हा मशिनमध्ये गडबड नव्हती अन् आता…’, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राम शिंदेंचा उत्तम जानकरांना खोचक टोला
सलमान खानने बुलेटप्रूफ काचेतून चाहत्यांना दिल्या ईदच्या शुभेच्छा