डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय कर्मचारी आणि संस्थांना सुट्टी जाहीर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर याची घोषणा केली आहे. याबाबतच्या अधिकृत निवेदनात सांगण्यात आलं आहे की, हा निर्णयानुसार यूपीएससी, सीव्हीसी, राष्ट्रीय अनुसूचित जाती/जमाती आयोग, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, केंद्रीय माहिती आयोग आणि इतर महत्त्वाच्या सरकारी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालये महाविद्यालयांनाही या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List