मुंबई पोर्टकडे दुर्लक्ष करू नका, अरविंद सावंत यांनी लोकसभेत केंद्र सरकारचं लक्ष वेधलं

मुंबई पोर्टकडे दुर्लक्ष करू नका, अरविंद सावंत यांनी लोकसभेत केंद्र सरकारचं लक्ष वेधलं

मुंबई पोर्टला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. जसं गाय दूध देतेय तोपर्यंत तिच्याकडे पाहिलं जातं आणि गाय म्हातारी झाली की तिच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, तसं आज मुंबई पोर्टला दुर्लक्षित केलं जात आहे. मात्र गाय म्हातारी आहे असे समजू नका, तिच्यात अजूनही दूध देण्याची ताकद आहे, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबई पोर्टचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला आहे. समुद्रमार्गे माल वाहतूक विधेयक 2024 वर बोलताना अरविंद सावंत यांनी मुंबई पोर्टकडे दुर्लक्ष करू नका, असं संसदेत म्हटलं आहे.

लोकसभेत बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, “लोकांच्या मनात अशी भावना येते की, मुंद्रा पोर्ट झालं म्हणून मुंबई पोर्टला दुर्लक्षित केलं जात आहे. आज जेएनपीटीची अवस्थाही वाईट आहे. पोर्ट व्यवसाय का मंदावत आहे, याचाही आपण विचार केला पाहिजे.”

अरविंद सावंत पुढे म्हणाले की, “वाढवन पोर्ट असो किंवा मुंबई पोर्ट, सर्वात मोठी गोष्ट ही आहे की, रोजगार किती उपलब्ध होतील? मुंबई पोर्टमधे आधी 40000 हजार कर्मचारी काम काम करत होते. आज तिथे जेमतेम 3000 लोक काम करत आहेत.”, असं म्हणत त्यांनी मुंबई पोर्टमध्ये घटलेल्या नोकऱ्यांबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

त्वचेसाठी आणि केसांसाठी वरदान आहेत ‘या’ गोष्टी! केरात फेकताना जरा जपून.. त्वचेसाठी आणि केसांसाठी वरदान आहेत ‘या’ गोष्टी! केरात फेकताना जरा जपून..
    आपल्या आरोग्यासाठी फळे एक उत्तम खजिना आहेत. त्यामुळे नियमितपणे फळांचे सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्या टाळता येतात. केवळ फळेच
Beed: बीडच्या कारागृहात कैद्यांचा राडा, वाल्मीक कराडच्या कानाखाली काढला आवाज
डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार? मुलाखतीत दिले स्पष्ट संकेत
ऑफिसची डेडलाइन, रोजचा प्रवास, टेन्शन्स यांनी त्रासले आहात; तुमचे टेन्शन्स दूर करण्यासाठी ट्राय करा ‘हे’ पर्याय
महिलेला कौमार्य चाचणीसाठी भाग पाडता येणार नाही, हे प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन; न्यायालयाचे महत्त्वपूर्ण मत
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्यामागे फडणवीस, मोदी, शहा यांचा मोठा हात; संजय राऊत यांची टीका
आता मंगळसूत्रही गहाण ठेवण्याची वेळ येईल, मोदी है, तो मुमकिन है! सोने तारण कर्जदार वाढल्याने काँग्रेसचा निशाणा