कुणाल कामराला मोठा दिलासा, मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन केला मंजूर
मद्रास उच्च न्यायालयाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाण्यावरून झालेल्या वादानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबईच्या खार पोलिसांनी कुणाल कामराला 31 मार्च रोजी समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मुंबई पोलीस त्याला अटक करू शकते, अशी त्याला भीती असल्याने त्याने मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धाव घेतली होती.
कुणालला अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, तो महाराष्ट्राच्या न्यायालयात जाऊ शकत नाही. कारण त्याच्या जीवाला धोका आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List