आसाराम बापूचा अंतरिम जामीन आणखी 3 महिन्यांसाठी वाढवला

आसाराम बापूचा अंतरिम जामीन आणखी 3 महिन्यांसाठी वाढवला

आसाराम बापूला गुजरात उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने आसारामचा अंतरिम जामीन 30 जूनपर्यंत वाढवला आहे. वैद्यकीय कारणास्तव त्याला हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 86 वर्षीय आसाराम बापूला 2013 च्या बलात्कार प्रकरणात 2023 मध्ये दोषी ठरवण्यात आले होते. ज्यासाठी तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने आसाराम बापूला वैद्यकीय कारणास्तव 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. आता गुजरात उच्च न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन 30 जूनपर्यंत वाढवला आहे. आसाराम बापूने उच्च न्यायालयात सहा महिन्यांसाठी अंतरिम जामीन अर्ज दाखल केला होता. त्याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, डॉक्टरांनी आसाराम बापूला पंचकर्म थेरपी घेण्याचा सल्ला दिला आहे. ही 90 दिवसांची उपचारपद्धती आहे. त्याच्या वकीलांच्या युक्तिवादानंतर आसारामचा अंतरिम जामीन आणखी 3 महिन्यांसाठी वाढवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kalash Yatra : कलश यात्रेदरम्यान तणाव, मुंबईत मालाडमध्ये दोन हिंदू तरुणांना जमावाकडून मारहाण Kalash Yatra : कलश यात्रेदरम्यान तणाव, मुंबईत मालाडमध्ये दोन हिंदू तरुणांना जमावाकडून मारहाण
महाराष्ट्रात काल गुढी पाडव्याचा सण उत्साहात साजरा झाला. या गुढी पाडव्याच्या निमित्ताने ठिकठिकाणी शोभा यात्रा निघाल्या होत्या. मालाड पूर्वेला कलश...
संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या, हा शोध कुठून लावला?; संजय राऊत यांचा मोदींना सवाल
रेखा अमिताभ नाही तर या अभिनेत्याच्या प्रचंड प्रेमात होत्या ; गर्लफ्रेंडने पकडलं होतं रंगेहाथ
‘छावा’ पुढे ‘सिकंदर’ही हारला! सलमान मोडू शकला नाही विकीचा रेकॉर्ड.. ओपनिंग डे कलेक्शन किती जाणून घ्या
त्वचेसाठी आणि केसांसाठी वरदान आहेत ‘या’ गोष्टी! केरात फेकताना जरा जपून..
Beed: बीडच्या कारागृहात कैद्यांचा राडा, वाल्मीक कराडच्या कानाखाली काढला आवाज
डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होणार? मुलाखतीत दिले स्पष्ट संकेत