IPL 2025 – संघ हरला पण कर्णधाराने इतिहास रचला, एक खास विक्रम केला आपल्या नावावर
आयपीएल 2025 मधील सातव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबदचा लखनऊ सुपर जायंट्सने 5 विकेटने पराभव केला. हैदराबादची हा हंगामातील पहिलाच पराभव ठरला. पहिल्या सामन्यात त्यांनी राजस्थानला धुळ चारली होती. परंतु लखनऊविरुद्धच्या सामन्यात संघ हरला असला, तरी कर्णधार पॅट कमिंन्सने एका खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. तसेच असा विक्रम करणारा तो चौथा फलंदाज आणि पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
लखनऊविरुद्ध राजीव गांधी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभा करेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु संघाला 200 धावांवर्यंतही मजल मारता आली नाही. कर्णधार पॅट कमिंन्सने फलंदाजीला येताच पहिल्या तीन चेंडूंवर जोरदार आक्रमन करत षटकार ठोकले. फलंदाजीला येताच पहिल्याच तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकणारा पॅट कमिंन्स चौथा फलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर या यादीत प्रवेश करणारा तो पहिलाच गोलंदाच आहे. पॅट कमिंन्सने 17 व्या षटकात हैदराबाद संघासाठी डोकेदुखी ठरलेल्या शार्दुल ठाकूवर आक्रमन केले. शार्दूलच्या दोन आणि आवेश खानच्या गोलंदाजीवर पॅट कमिंन्सने षटकार ठोकला. त्याने तीन चेंडूंमध्ये तीन षटकार ठोकत फक्त 18 धावा केल्या आणि तो बाद झाला. पहिल्या तिन्ही चेंडूंवर षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुनील नारायण, निकोलस पुरन आणि महेंद्रसिंग धोन या खेळाडूंचा समावेश आहे.
‘लॉर्ड’ शार्दुल, नाव लक्षात ठेवा! हैदराबादला ‘वेसण’ घातल्यानंतर सोशल मीडियावर ठाकूरचीच हवा
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List