Benefits Of Jumping Rope- दोरी उड्या मारा आणि ठणठणीत राहा! सविस्तर वाचा दोरी उडी मारण्याचे फायदे
आपल्या प्रत्येकाची व्यायामाची आवड ही वेगवेगळी असते. कुणाला सकाळी उठून चालायला जाणे आवडते. तर कुणाला जिममध्ये जाऊन घाम गाळायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का, दोरी उडी हा एक सर्वोत्तम व्यायाम आहे. दोरी उडीने केवळ वजन कमी होत नाही, तर आपल्याला इतर अनेक फायदेही मिळतात.
जिममध्ये जाऊ शकत नाहीत किंवा धावणे आणि जॉगिंग करणे यासारख्या शारीरिक व्यायाम करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत दोरीने उडी मारणे खूप फायदेशीर ठरू शकते. बर्याच अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की दररोज उडी मारण्याच्या दोरीने हृदय व मानसिक आरोग्य राखते तसेच तग धरण्याची क्षमताही वाढते.
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्याला व्यायामाबरोबरच आहारावरही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. दोरी उड्यांच्या सरावामुळे हृदयरोगाचा धोका देखील कमी होतो. तसेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी दोरी उडी हा सर्वात बेस्ट पर्याय आहे.
दोरी उडी मारल्यामुळे आपले शरीर अधिकाधिक लवचिक होते. त्यामुळे स्नायूंना सुद्धा चांगला व्यायाम मिळतो. मुख्य म्हणजे आपल्यातील रक्ताभिसरण उत्तम झाल्यामुळे, चिंता आणि नैराश्य कमी होते. व्यायामामुळे आपल्या शरीरात आणि मेंदूमध्ये रक्त परिसंचरण वाढू शकते.
सतत काम केल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवत असेल तर स्किपिंगमुळे स्टॅमिना सुधारू शकतो. एका अहवालानुसार, हृदयाची गती वाढवते म्हणून दोरी उडी मारणे हा उत्तम कार्डिओ व्यायाम आहे. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकतो.
दोरी उडी मारताना ही खबरदारी घ्या.
दोरीच्या उडी मारण्यापूर्वी किमान 10 मिनिटे आधी काहीतरी व्यायाम करा. तळव्यांना होणारी इजा टाळण्यासाठी मोजे घालावेत.
(कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List