“2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री”, चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत, हात जोडत शिंदे यांची एका शब्दात मोठी प्रतिक्रिया

“2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री”, चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत, हात जोडत शिंदे यांची एका शब्दात मोठी प्रतिक्रिया

महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून झालेले नाट्य उभ्या महाराष्ट्राने पाहिले. एकनाथ शिंदे अचानक गावी गेले. तिथून ठाण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील बडे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची चर्चा झाली. यापूर्वी मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी नंतर उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. महायुतीत पालकमंत्री पदावरून टोकाचे वाद दिसले. पण बडे नेते याविषयीची कोणतीही कटुता सार्वजनिकपणे न मांडण्याची प्रथा मोडत नाहीत हे विशेष. सध्या महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे भाकीत केले आहे. त्यावरून सध्या राज्यात चर्चेला उधाण आले आहे.

2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री

2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. त्याला एकनाथ शिंदे यांच्या एका कृतीची किनार आहे. पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातीने तिथे हजर राहिले. त्यांनी तिथे जाऊन महाराष्ट्रातील पर्यटकांना दिलासाच दिला नाही. तर त्यांची महाराष्ट्रात परतण्याची व्यवस्था केली. जखमींची भेट घेतली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना मदतासाठी पाठवले होते. पण ही श्रेयवादाची लढाई असल्याचे बोलले जात होते.

दरम्यान एका सभेत बोलताना बावनकुळे यांनी मोठे भाकीत केले. 2034 पर्यंत फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असे बावनकुळे म्हणाले. विकसीत महाराष्ट्र हा फडणवीस यांचा संकल्प आहे. फडणवीस मुख्यमंत्री असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकारच राज्याचा विकास, भले करू शकतात, असे बावनकुळे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काय?

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्याची एकच चर्चा होत आहे. भाजपाच्या नेतृत्वातच आता यापुढे सरकार चालणार असा त्यामागे हेतू असल्याची चर्चा होत आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांनी याविषयी विचारले असता, त्यांनी हात जोडत नमस्कार केला आणि शुभेच्छा अशा एका शब्दात प्रतिक्रिया दिली.

तर शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावर धडक प्रतिक्रिया दिली. 2034 कशाला ते 2080 पर्यंत मुख्यमंत्री राहू द्या, असा चिमटा त्यांनी काढला. पण त्याचवेळी आमच्यात कोणी भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होणार नाही, असे सांगायला ते विसरले नाहीत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो गुवाहाटीला…’, शिंदेंचा पुन्हा ठाकरेंना खोचक टोला ‘डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो गुवाहाटीला…’, शिंदेंचा पुन्हा ठाकरेंना खोचक टोला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला...
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वी सोनाक्षी सिन्हा-जहीर इकबालने दिली गुड न्यूज; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
अशोक सराफ यांचा मुलगा जगतो असं आयुष्य ‘की’ प्रत्येकाला वाटेल अभिमान, नेमकं करतो तरी काय?
मी काश्मीरला जाणार…, पहलगाम हल्ल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने केलं जाहीर
Video: पाकिस्तानात सलमान खान पार्क करत आहे बाइक? कराचीमधील व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा MahaCPD प्लॅटफॉर्म – राज्यभरातील डॉक्टरांसाठी डिजिटल सीपीडीचे उपक्रम
summer hydration: उन्हाळ्यात उष्मघाताच्या समस्या होऊ नये यासाठी ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो…