Pune news – पालिकेला कंत्राटी सुरक्षारक्षक पुरविण्यास 22 कंपन्या इच्छुक, दंडात्मक कारवाई केलेल्या कंपन्या होणार अपात्र

Pune news – पालिकेला कंत्राटी सुरक्षारक्षक पुरविण्यास 22 कंपन्या इच्छुक, दंडात्मक कारवाई केलेल्या कंपन्या होणार अपात्र

महापालिकेच्या मुख्य इमारतींसह इतर विभागांना कंत्राटी सुरक्षारक्षक नेमण्याच्या 139 कोटींच्या निविदेसाठी 22 कंपन्यांनी पालिका प्रशासनाकडे इच्छा व्यक्त केली आहे. आज झालेल्या प्रीबीड बैठकीला या 22 कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ज्या कंपन्यांवर गेल्या 5 वर्षांत कोणत्याही स्वरूपाची दंडात्मक कारवाई झालेली आहे, त्या कंपन्यांना या निविदा प्रक्रियेतून अपात्र करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे फसवणूक व दंडात्मक कारवाई झालेल्या ठेकेदाराची उपस्थिती केवळ कागदावर राहणार आहे.

महापालिकेकडून मुख्य इमारतीसह इतर मालमत्तांच्या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमले जातात. हे सुरक्षा कंत्राटी असल्याने मुदत संपल्यानंतर नव्याने दरवर्षी निविदा प्रसिध्द केल्या जातात. त्यानुसार महापालिकेने यंदा निविदा प्रसिध्द केली असून निविदेची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी पालिकेत आज बैठक पार पडली. या निविदा मिळविण्यासाठी 22 कंपन्यांनी पालिका प्रशासनाकडे इच्छा व्यक्त केली आहे. बैठकीत प्रामुख्याने सुरक्षारक्षक पुरविण्यासाठी ठिकाणांवर प्रामुख्याने चर्चा झाली. तसेच निविदा 5 ते 7 वर्षांसाठी काढण्यात याव्यात, पोलिसांकडून घेतल्या जाणाऱ्या एनओसीबाबत तसेच एकूण कामगार कायद्यानुसार असलेल्या नियमांवर चर्चा झाल्याचे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

इगल कंपनीवर होणार कारवाई

इगल सिक्युरिटी अॅन्ड पर्सोनल सर्व्हिसेस या कंपनीकडून पालिकेला सुरक्षारक्षक पुरविले जातात. या कंपनीकडे पालिकेचे कंत्राट आहे. याचा गैरफायदा घेत कंपनीने मुंबईत काम करणारे सुरक्षारक्षक पालिकेत दाखवून त्यांचा पगार घेऊन पालिकेची फसवणूक केली होती. या कंपनीवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली होती. त्यामुळे या कंपनीला यंदाचे कंत्राट मिळण्याची शक्यता धुसर झाली असून, या कंपनीला काळ्या यादीत टाकले जाणार असल्याची चर्चा आहे.

क्रिस्टल कंपनीला निविदा प्रक्रियेतून बाहेर काढणार?

क्रिस्टल कंपनीकडून पालिकेला सुरक्षारक्षक पुरविले जात होते. या कंपनीकडून सुरक्षारक्षकांना कामगार कायद्याअंतर्गतचे कोणतेही लाभ दिले नव्हते. नियमानुसार वेतनवाढही करत नाही. ही ठेकेदार कंपनी पालिकेसोबत झालेल्या करारातील अटींचे कोणत्याही प्रकारचे पालन करत नाही, अशा अनेक तक्रारींमुळे ही कंपनी वादग्रस्त असल्याने या कंपनीला निविदा प्रक्रियेतून काढले जाणार असल्याची पालिका वर्तुळात चर्चा आहे. यावर अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. म्हणाले, ‘या कंपनीवर कारवाई केल्याचे सध्या तरी कागदपत्रांनुसार कारवाई केल्याची माहिती समोर आलेली नाही. याबाबत माहिती घेतली जाईल. कारवाई झाल्याचे निष्पन्न झाल्यास नियमानुसार निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ही बॉलिवूड अभिनेत्री होती तिच्या शाळेतील शिक्षकाच्या प्रेमात; 39 व्या वर्षीही आहे सिंगल ही बॉलिवूड अभिनेत्री होती तिच्या शाळेतील शिक्षकाच्या प्रेमात; 39 व्या वर्षीही आहे सिंगल
हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी केवळ त्यांच्या अभिनय आणि चित्रपटांमुळेच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिल्या...
Latur News – लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस, फळबागांचे नुकसान; शेतकऱ्यांना फटका
हिंदुस्थानने झेलम नदीमध्ये पाणी सोडले; पाकिस्तानात पूर, आणीबाणी लागू
पाकिस्तानी भैया, माझा मित्र! अतिरेक्यासोबत बंगाली तरुणाच्या फोटोने खळबळ
अनियंत्रित पिकअप वाहनाने 11 स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, 7 जणांचा मृत्यू; चौघे गंभीर
Jammu Kashmir – दोन दहशतवादी मोबाईलमध्ये कैद; मावळमधील पर्यटकाकडे मोठा पुरावा
सिंधू जल करार रद्द : पाकला झोंबलं म्हणून अशी आगलाऊ भाषा, लेफ्टनंट कर्नल डॉ.सतीश ढगे काय म्हणाले?