तडजोडीची वेळ गेली, इंदिरा गांधींसारखा एक धाव घाला अन् पाकिस्तानचे 2 तुकडे करा! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात मंगळवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला असून पाकिस्तानविरुद्ध संपात व्यक्त होत आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने सुरू आहेत. पाकपुरस्कृत या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथेही कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून पीओकेचा हिंदुस्थानमध्ये समावेश करण्याची मागणी केली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हैदराबादमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला. या मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन औवेसी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्यासर अनेक प्रमुख नेते सहभागी झाले होते. यावेळी बोलताना रेवंत रेड्डी म्हणाले की, पहलगाम सारख्या घटना रोखायच्या असतील तर निर्णायक कारवाईची गरज आहे. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वायजेपी यांनी 1971 च्या बांगलादेश निर्मिती युद्धानंतर तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना दुर्गा देवीशी केल्याची आठवणही करून दिली.
तुम्ही (पंतप्रधान मोदी) दुर्गा देवीचे स्मरण करून आणि पाकिस्तानवर कारवाई करा. पाकिस्तानवर हल्ला करा किंवा इतर कोणताही उपाय करा. तडजोड करण्याची वेळ गेली असून आज पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली गेली पाहिजेत. पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्यायला पाहिजे, असे म्हणत सरकार घेईल त्या निर्णयामागे आमच्यासह 140 कोटी जनता उभी राहील, असेही रेवंत रेड्डी म्हणाले.
ही राजकारण करण्याची वेळ नाही. पाकिस्तानचे दोन तुकडे करा आणि पाकिस्तानच्या ताब्यातील कश्मीर (पीओके) हिंदुस्थानात घ्या. आम्ही तुमच्यासोबत उभे असून तुम्ही दुर्गा मातेचे भक्त आहात. इंदिरा गांधी यांचे स्मरण करा, असेही रेवंत रेड्डी म्हणाले.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांची गुलमर्गमध्ये हाय–प्रोफाइल पार्टी; कार्यक्रमाचा व्हिडीओ व्हायरल
ते पुढे म्हणाले की, 1965 मध्ये पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा इंदिरा गांधी यांनी चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर 1971 मध्ये पाकिस्तानने हल्ला केला तेव्हा इंदिरा गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली होती. आताही पाकिस्तानच्या दुष्कृत्यांना प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. तडजोडीची वेळ नसून आपण निर्णायक कारवाई केली पाहिजे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List