IPL 2025 – चेन्नईच्या पराभवाची साडेसाती कायम, हैदराबाद विजयी ‘हर्ष’

IPL 2025 – चेन्नईच्या पराभवाची साडेसाती कायम, हैदराबाद विजयी ‘हर्ष’

महेंद्रसिंग धोनीचा 400 वा सामनाही चेन्नईच्या पराभवाची साडेसाती संपवण्यात अपयशी ठरला. हैदराबादविरुद्धच्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यातही चेन्नईला आपल्या घरच्याच मैदानावर दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईचे 156 धावांचे माफक आव्हान हैदराबादने आठ चेंडू आधीच गाठले आणि आपले आयपीएलमधील आव्हान जिवंत राखण्यात यश मिळवले. हैदराबादने आपल्या नवव्या सामन्यात तिसरा विजय मिळवला तर चेन्नईला नऊ सामन्यांत सातवा मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे चेन्नईला सलग दुसऱयांदा साखळीतच गारद व्हावे लागणार आहे.

हैदराबादने आज हर्षल पटेलच्या भन्नाट गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईच्या डावाला 154 धावांतच गुंडाळले. हर्षलने 28 धावांत 4 विकेट टिपत पहिल्या डावातच हैदराबादच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. हैदराबादी आक्रमणापुढे 17 वर्षीय आयुष म्हात्रे (30) आणि डिवाल्ड ब्रेविस (42) यांनी उपयुक्त खेळ केला. 13 षटकांत 4 बाद 114 अशी मजल मारणाऱया चेन्नईला दिग्गज फलंदाज असतानाही 154 धावांवरच समाधान मानावे लागले. सारेच फलंदाज झटपट धारातीर्थी पडल्यामुळे चेन्नईने शेवटच्या 7 षटकांत केवळ 40 धावाच काढल्या. येथेच हैदराबादने आपला विजय निश्चित केला होता.

आजचा सामना जिंकणार तोच टिकणार या सूत्रानेच खेळायला हैदराबाद मैदानात उतरली आणि दुसऱयाच चेंडूवर खलिल अहमदने झंझावाती फलंदाज अभिषेक शर्माला आपले खातेही उघडू दिले नाही. मग ट्रव्हिस हेडही फार काही करू शकला नाही. तो 19 धावांवर बाद झाला, पण तेव्हा इशान किशनने 34 चेंडूंत 44 धावांची खेळी साकारली. नूर अहमदने आपल्या सलग षटकांत इशान आणि अनिकेत वर्माची विकेट काढून हैदराबादची 5 बाद 106 अशी स्थिती केली. या क्षणी सामना दोलायमान स्थितीत होता. चेन्नईने सामन्यावर नियंत्रण मिळवले होते, पण तेव्हा कामिंदू मेंडिस आणि नितीश राणाने 49 धावांची अभेद्य भागी रचत हैदराबादचा विजय निश्चित केला आणि मग 19 व्या षटकात त्यावर शिक्कामोर्तबही केले.

IPL 2025 – धोनी चारसौ पार

चेन्नईची वाट बिकट

गेल्या मोसमातही चेन्नईने निराशा केली होती आणि या मोसमातही ते पराभवांना रोखू शकलेले नाहीत. आजच्या सातव्या पराभवामुळे राजस्थानपाठोपाठ चेन्नईचीही प्ले ऑफची वाट बिकट झाली आहे. आता पुढील पाचही सामने जिंकले तरी चेन्नईला आघाडीच्या संघाच्या सलग पराभवाची वाट पाहावी लागणार आहे. पण सध्याचे आकडे पाहता चेन्नईसाठी 18 वा मोसम जवळजवळ संपला आहे. फक्त त्यावर पुढच्या सामन्यात शिक्का बसेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री”, चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत, हात जोडत शिंदे यांची एका शब्दात मोठी प्रतिक्रिया “2034 पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री”, चंद्रशेखर बावनकुळेंचे भाकीत, हात जोडत शिंदे यांची एका शब्दात मोठी प्रतिक्रिया
महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून झालेले नाट्य उभ्या महाराष्ट्राने पाहिले. एकनाथ शिंदे अचानक गावी गेले. तिथून ठाण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील...
आम्हाला इथंच गोळ्या घाला, पण पाकिस्तानसारख्या नरकात परत पाठवू नका! निर्वासित हिंदूंची याचना
तडजोडीची वेळ गेली, इंदिरा गांधींसारखा एक धाव घाला अन् पाकिस्तानचे 2 तुकडे करा! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी
डहाणू, तलासरीत आंब्याला कागदी पिशव्यांचे सुरक्षा कवच; पक्षी, ढगाळ वातावरणाने बागायतदारांची डोकेदुखी
महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल, एकीकडे उष्णतेचा ऑरेंज अलर्ट, दुसरीकडे गारपीटचा अंदाज
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेचाही 35 तासांच्या ब्लॉकमुळे 163 ट्रेन रद्द
मुंबई-नाशिक महामार्गावर बसचा भीषण अपघात, 8 वर्षांच्या चिमुकलीने गमावला जीव, अनेक जखमी