एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होईल, परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक यांची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा ७ तारखेला होईल, परिवहन मंत्री ‌प्रताप सरनाईक यांची घोषणा

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेला होईल,याची जबाबदारी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून माझी असेल असे नि:संदिग्ध आश्वासन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहे. ते एसटी मुख्यालयात महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारताना बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि परिवहन आयुक्त विवेक भीमनराव, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर आणि सर्व खाते प्रमुख उपस्थिती होते.

ते पुढे म्हणाले की,आर्थिक अडचणीमुळे एसटीत काम करणाऱ्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन केवळ ५६% देता आले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यापुढे महिनाभर कष्ट करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचा पगार दरमहा ७ तारखेला त्यांच्या बॅक खात्यांत जमा करण्यात येईल! त्यासाठी राजशिष्टाचार सोडून महामंडळाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांना भेटून विनंती करेन!  परंतु आर्थिक अडचणीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन कधीही रखडणार नाही याची जबाबदारी मी घेईन, असे नि: संदिग्ध आश्वासन मंत्री सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिले.

एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यातील १३ कोटी जनतेला सुरक्षितता आणि किफायतशीर परिवहन सेवा देणारी एसटी ही महाराष्ट्राची ” लोकवाहीनी ” आहे असेही ते म्हणाले.

बसेस मध्ये सी सीटीव्ही कॅमेरे

यापुढे एसटीला आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच परिवहन सेवा प्रवासीभिमुख व दर्जेदार करण्यासाठी काही चांगले निर्णय देखील आम्ही घेणार आहोत. त्यामध्ये सर्व बसस्थानकावरील प्रसाधनगृहे ही अत्याधुनिक पद्धतीची स्वच्छ व निर्जंतुक असतील. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक बसस्थानकावर आणि नवीन येणाऱ्या बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटन, सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे, या वर भर देणार आहोत.

बसस्थानकांचे आधुनिकीकरण करणार..

बस स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी खाजगी विकासकांच्या माध्यमातून बांधा- वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्त्वावर राज्यातील एसटीच्या बहुतांश जागा विकसित करण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ६६ जागांची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये संबंधित विकासकाने एसटीच्या जिल्हा स्तरांवरील जागे सह तालुका स्तरांवरील जागा व ग्रामीण भागातील जागा अशा ३ जागा विकसित करावयाची आहेत. त्यामुळे एसटीच्या अविकसित जागा देखील चांगल्या विकासकाकडून विकसित होतील.

२५ हजार बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार

सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या सर्व जुन्या बसेस स्क्रॅप करण्यात येत असून त्याठिकाणी नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यंदा २६४० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार असून त्यापैकी ११३ आगारात ८०० पेक्षा जास्त नवीन बसेस प्रवासी सेवेत रुजू झालेल्या आहेत. सध्या ३ हजार नवीन बसेसची निविदा प्रक्रिया सुरू असून भविष्यात ग्रामीण आणि दुर्गम भागात उपयुक्त ठरेल अशा मिडी बसेस घेण्यात येणार आहेत. तसेच शहरी भागातील उन्नत स्तरातील प्रवाशांसाठी २०० अत्याधुनिक, वातानुकूलित शयनयान बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी घेतल्या जातील. त्यामुळे भविष्यात शहरापासून गाव खेड्यांपर्यंत, महानगरापासून आदिवासी पाड्यापर्यंत एसटीची परिवहन सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सूरज चव्हाणला चित्रपटातील रोल झेपेल का? मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष सूरज चव्हाणला चित्रपटातील रोल झेपेल का? मिलिंद गवळींच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष
‘बिग बॉस मराठीचा ५’ चा विजेता सूरज चव्हाण हा लवकरच ‘झापूक झुपूक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे...
पूर्व द्रुतगती महामार्गावर कचरा वाहून नेणारा ट्रक उलटला, एकाचा मृत्यू; दोन जखमी
प्रेमप्रकरणाच्या संशयातून जोडप्यातील भांडण टोकाला गेले, संतापलेल्या पतीने 9 महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवले
गुन्हेगारीचा प्रवास दाऊद इब्राहिमपासून आता बीडला पोहोचला, म्हणजे राजकारणापर्यंत पोहोचलेला आहे; संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांना सणसणीत टोला
Sindhudurg News – तीने जीव दिला नाही…; नवऱ्यासह सासू, सासरे आणि नणंदेवर गुन्हा दाखलं
US Air Strike – येमेनमधील तेल बंदरांवर अमेरिकेकडून हवाई हल्ला, 74 जणांचा मृत्यू; 171 जखमी
ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांनी आता…, गुलाबराव पाटील यांचा पुन्हा उद्धव ठाकरेंना टोला