Pahalgam Attack – 14 नावे, 14 टार्गेट! जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांची उलटी गिनती सुरू, ‘हिट लिस्ट’मधील नावे आली समोर
जम्मू-कश्मीरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संपाताची लाट उसळली असून बदला घेण्याची मागणी होत आहे. या हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्येही दहशतवाद्यांविरोधातील मोहिमेला वेग आला असून खोऱ्यात सक्रिय असणाऱ्या 14 स्थानिक दहशतवाद्यांची यादी बनवण्यात आली आहे. हे दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करत असून त्यांना दहशतवादी हल्ल्यासह पळून जाण्यासही मदत करतात, असा आरोप आहे.
सुरक्षा दलाने बनवलेल्या यादीतील 14 जणांची नावेही आता समोर आली आहे. लवकर या दहशतवाद्यांविरोधात कारवाईला वेग येणार असून त्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई केली जाणार आहे. त्यांनी या दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा केली जाईल.
कोण आहेत हे 14 दहशतवादी
1. आदिल रहमान देंतू – हा लश्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर आहे. 2021 पासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे. सुरक्षा दल त्याचा शोध घेत आहे.
2. आसिफ अहमद शेख – जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य असलेला आसिफ अवंतीपुरा जिल्ह्याचा कमांडर आहे. 2022 पासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे.
3. एहसान अहमद शेख – हा पुलवामामध्ये सक्रिय असून लश्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आहे. 2023 पासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असून त्याचाही शोध सुरू आहे.
4. हजीर नजीर – हा पुलवामातील दहशतवादी आहे. लश्कर-ए-तोयबाचा सदस्य असलेला हजीर सुरक्षा दलाच्या निशाण्यावर आहे.
5. आमिर नाजीर वाणी – याचा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची संबंध असून हा पुलवामातील सक्रिय दहशतवादी आहे.
6. अहमद भट्ट – हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य असून पुलवामामध्ये सक्रिय आहे. त्याचाही शोध घेण्यात येत असून त्याला यमसदनी धाडल्यानंतर त्याच्याही घरावर कारवाई करण्यात येईल.
7. आसिफ अहमद कंडे – हा शोपिया जिल्ह्यातील सक्रिय दहशतवादी असून जुलै 2015 मध्ये हिजबुल मुजाहिद्दीने या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. तेव्हापासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असून पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदतही करतोय.
8. नसीर अहमद वाणी – शोपियातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये याचा सक्रिय सहभाग आहे. लश्कर-ए-तोयबाचा हा सदस्य असून पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत करतो.
9. शाहिद अहमद कुटे – हा दहशतवादी शोपिया जिल्ह्यात सक्रिय आहे. लश्कर-ए-तोयबा आणि टीआरएफचा हा दहशतवादी असून 2023 पासून या भागात सक्रिय आहे.
10. आमिर अहमद डार – हा स्थानिक दहशतवादी असून शोपियामध्ये 2023 पासून सक्रिय आहे. लश्कर-ए-तोयबा आणि टीआरफ सोबत मिळून हा काम करत आहे.
11. अदनान सफी डार – हा शोपिया जिल्ह्यातील सक्रिय दहशतवादी असून 2024 मध्ये दहशतवादी संघटनेत सहभागी झाली होता. लश्कर-ए-तोयबा आणि टीआरफ सोबत मिळून हा काम करत आहे. पाकिस्तानी हँडलरच्या सूचना दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम अदनान करतो.
12. जुबेर अहमद वाणी – हा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी असून अनंतनाग जिल्ह्यातील ऑपरेशनल कमांडर आहे. हा ए प्लस सक्रिय दहशतवादी असून सुरक्षा दलांवरील हल्ल्यांमध्ये अनेकदा त्याचे नाव आले आहे. 2018 पासून सक्रिय आहे.
13. हारून रशीद गनी – हिजबुल मुजाहिद्दीनचा अनंतनाग जिल्ह्यातील सक्रिय दहशतवादी असलेला हारूनचा सुरक्षा दल शोध घेत आहेत. काही वर्षांपूर्वी तो पीओकेमध्ये गेला होता, तिथे त्याने दहशतवादाचे प्रशिक्षण घेतले होते.
14. जुबेर अहमद गनी – हा कुलगाममधील दहशतवादी आहे. लश्कर-ए-तोयबामध्ये सहभागी होऊन त्याने सुरक्षा दलांवर हल्ले केले आहेत. तसेच टार्गेट किलिंमध्येही तो सहभागी असून द रेजिस्टेंट फ्रंटसोबत काम करतो. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
आम्हाला इथंच गोळ्या घाला, पण पाकिस्तानसारख्या नरकात परत पाठवू नका! निर्वासित हिंदूंची याचना
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List