कोंबडीवड्यांवरून राजकारण तापलं, ‘कोंबडी चोरांना…’, शिवसेना ठाकरे गटाचा राणेंना खोचक टोला

कोंबडीवड्यांवरून राजकारण तापलं, ‘कोंबडी चोरांना…’, शिवसेना ठाकरे गटाचा राणेंना खोचक टोला

भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. जेव्हा उद्धव ठाकरे येतील तेव्हा हॉटेलमध्ये कोंबडी वडे आणि माशे ठेवू नका असं मी सर्व हॉटेल वाल्यांना सांगितलं आहे.  मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कोकणाला काय दिले? केवळ मासे, मटण खाण्यासाठीच ते कोकणात यायचे, असा हल्लाबोल राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला होता, दरम्यान यावरून आता वातावरण चांगलंच  तापलं आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून नारायण राणे यांच्यावर जोरदार पलटवार करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले विनायक राऊत?  

नारायण राणेंच्या बुद्धीची मला नेहमीच कीव येते. पण मला आता काय त्यांच्यावर टीका करायची नाही. उतरत्या वयात आहेत. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे. साठी बुद्धी नाटी तसं त्यांचं झालं आहे. आम्हाला कोणाला काही त्याचा फरक पडत नाही. परंतु कोंबडी वडे केवळ हॉटेलात मिळतात असं नाही, तर कोकणातील प्रत्येक घरांमध्ये कोंबडी वडे मिळतात, आणि या कोंबडीचोरांना कोंबडीवड्याचं महत्त्व काय कळणार. पण कोकणातील माणूस आणि उद्धवजी ठाकरे यांचं जे नात आहे, ते कोंबडी वड्यावर अवलंबून नाही. पण उद्धव ठाकरे येतील ते कोंबडी चोरांना गाडण्यासाठी येतील, असा घणाघात यावेळी विनायक राऊत यांनी राणेंवर केला आहे. दुसरीकडे अरविंद सावंत यांनी देखील राणेंना यावरून खोचक टोला लगावला आहे.

काय म्हणाले सावंत? 

नारायण राणे कोण आहेत, ते कुठल्या पक्षात आहेत. त्यांची सर्व वक्तव्य काढा, ज्यांची दखल कोणीच घेत नाही, ज्यांची दखल घेऊ नये त्यांची वक्तव्य तुम्ही सांगता. राणेंची महाराष्ट्र दखल घेत नाही, आणि घेऊही नाही, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.

राणे काय म्हणाले होते? 

अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना मिळालेल्या पैशांची आकडेवारी जरा मागवा, नाही तर मी तुम्हाला देतो. त्यातील किती पैसे त्यांनी सिंधुदुर्गाला दिले. मग कळेल त्यांना काय अधिकार आहे, कोकणाबद्दल बोलायचा आणि कोकणात यायचा. मी सगळ्या हॉटेलवाल्यांना सांगितलं कोंबडीवडे आणि माशे बंद, ज्या दिवशी उद्धव ठाकरे येतील त्या दिवशी. ते कोकणासाठी दुसरं काहीही करत नाहीत, ते फक्त तेवढेच खायला इकडे येतात, असं राणे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

KKR VS PBKS – पावसामुळे कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामना रद्द, दोन्ही संघांना किती मिळाले पॉईंटस्? KKR VS PBKS – पावसामुळे कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामना रद्द, दोन्ही संघांना किती मिळाले पॉईंटस्?
कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील ईडन गार्डन्सवर सुरू असलेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पंजाबने कोलकातासमोर चार...
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची करणार NIA चौकशी, केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आदेश
ही बॉलिवूड अभिनेत्री होती तिच्या शाळेतील शिक्षकाच्या प्रेमात; 39 व्या वर्षीही आहे सिंगल
Latur News – लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस, फळबागांचे नुकसान; शेतकऱ्यांना फटका
हिंदुस्थानने झेलम नदीमध्ये पाणी सोडले; पाकिस्तानात पूर, आणीबाणी लागू
पाकिस्तानी भैया, माझा मित्र! अतिरेक्यासोबत बंगाली तरुणाच्या फोटोने खळबळ
अनियंत्रित पिकअप वाहनाने 11 स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, 7 जणांचा मृत्यू; चौघे गंभीर