देशाला मूर्ख बनवू नका, पाकिस्तानचं पाणी बंद करणं खरंच शक्य आहे का? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा सवाल

देशाला मूर्ख बनवू नका, पाकिस्तानचं पाणी बंद करणं खरंच शक्य आहे का? शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा सवाल

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी थेट कारवाई करा असे आवाहन जगद्गुरु शंकराचार्य ज्योतिष्पीठाधीश्वर स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले. तसेच सरकारने पाकिस्तानचे पाणी बंद करणार अशी धमकी देण्यात काही अर्थ नाही हे खरंच शक्य आहे का असा सवालही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी विचारला.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले की, पहलगाममध्ये हिंदुवर झालेला हल्ला हा विचारपूर्वक होता. धर्म विचारून लोकांना मारलं हे क्रूरता आहे. दहशतवाद्यांनी सरळ सरळ युद्धासाठी चिथावणी दिली आहे. सरकारने याचा निषेध नव्हे तर धडक कारवाई करायला हवी, असे स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.

तसेच सिंधू नदी करार तोडून सरकार जनतेला मुर्ख नाही बनवू शकत. ज्यांनी दहशतवादी हल्ला केला आधी त्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. त्यानंतर सीमेपलीकडे बसलेल्या आकांना धडा शिकवण्यासाठी सरकारने युद्धाची तयारी केली पाहिजे. देशाची जनता सरकारसोबत आहे. सरकारकडून सतत पाकिस्तानचे पाणी बंद केले जाईल अशी धमकी दिली जात आहे. पण हे खरंच शक्य आहे का? पाणी बंद करण्याच्या धमकीमुळे दहशतवाद संपणार नाही. थेट कारवाई करावी अशी मागणीही स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिंधू जल करार रद्द : पाकला झोंबलं म्हणून अशी आगलाऊ भाषा, लेफ्टनंट कर्नल डॉ.सतीश ढगे काय म्हणाले? सिंधू जल करार रद्द : पाकला झोंबलं म्हणून अशी आगलाऊ भाषा, लेफ्टनंट कर्नल डॉ.सतीश ढगे काय म्हणाले?
सिंधू जल करार रद्द करणे किती महत्त्वाचे होते हे पाकच्या नेत्यांच्या अनेक विधानांवरून समजतं. एका बाजूला पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल...
या गोष्टीला वैतागून अनुष्का-विराटने लंडनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला; मोठं कारण आलं समोर
6 कोटींची कार, 100 कोटींचं घर… फक्त सौंदर्यावरच जाऊ नका; इतकी श्रीमंत आहे प्रसिद्ध अभिनेत्री रेखा
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालचे निधन; दोन दिवसांनी होता वाढदिवस, चाहत्यांना धक्का
पाकिस्तानशी क्रिकेटचे सर्व संबंध तोडा, सौरव गांगुलीने BCCIकडे केली मागणी
Mumbai News – विनयभंगाच्या गुन्ह्यात पीडितेचा जबाब पुरेसा नाही; सत्र न्यायालयाचा निर्वाळा
Pahalgam Terror Attack – अत्याचार करणाऱ्यांना धडा शिकवणं हा आपला धर्म; पहलगाम हल्ल्यावर मोहन भागवत यांचं विधान