कचराकुंडीत फेकलेली ‘नकोशी’ बनली अधिकारी, दृष्टीहीन माला पापळकर मुलींसाठी आदर्श

कचराकुंडीत फेकलेली ‘नकोशी’ बनली अधिकारी, दृष्टीहीन माला पापळकर मुलींसाठी आदर्श

ज्या दृष्टीहीन मुलीला ती लहान असताना कचराकुंडीत फेकून देण्यात आले होते, आज तीच मुलगी एमपीएससी उत्तीर्ण झाली. माला पापळकर असे तिचे नाव. 26 वर्षांची माला लवकरच नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कारकीर्दीला सुरुवात करणार आहे. कचराकुंडीपासून सरकारी नोकरीपर्यंतचा प्रवास करत माला आज अनेक मुलींसाठी आदर्श ठरली आहे. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट क परीक्षेचा निकाल जाहीर केला. निवडलेल्या उमेदवारामध्ये माला पापळकर हिचे नाव होते. 18 एप्रिल रोजी मालाला ही खूशखबर मिळाली. मालाचा आयुष्याचा प्रवास खूप कठीण राहिला. मालाला जळगाव रेल्वे स्थानकाच्या कचराकुंडीत टाकून देण्यात आलं होतं. तेथून तिला रिमांड होममध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्याच ठिकाणाहून तिला अमरावतीचे समाजसेवक शंकर बाबा पापळकर यांच्या देखरेखीखाली पाठवण्यात आले. माला आश्रमात आली, तेव्हा ती 10 वर्षांची होती. त्या वेळी असे समजले की, मालाची दृष्टी फक्त 5 टक्के आहे आणि तिला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. ती तब्बेतीनेही अशक्त होती. अशा परिस्थितीतही मालाने शिक्षण घेतले. आज माला आपल्या यशाचे श्रेय शंकर बाबा पापळकर यांनाच देते. ती म्हणते, मला माहीत नाही की माझे आई-वडील कुठे आहेत, पण बाबांनी मला त्यांचं नाव देऊन आई-वडिलांचा आधार दिला आहे. मला वाटलं नव्हतं की मी ही परीक्षा उत्तीर्ण करू शकेन. पण बाबा कायम म्हणायचे, तू नक्की करशील.’’

ऑडियो बुक्स वापरून केला अभ्यास

मालाने स्वामी विवेकानंद अंधशाळेत शिक्षण घेतले. अमरावती येथील भिवापूरकर ब्लाइंड स्पूलमधून बॅचरल पदवी मिळवली. 2019 मध्ये मालाने अमोल पाटील यांच्या युनिक अकादमीतून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. कोविड काळात ऑनलाईन अभ्यास करणे दृष्टीहीन विद्यार्थ्यांना अडचणीचे होते. मालाने ऑडियो बुक्स वापरून अभ्यास केला. दररोज सहा ते सात तास ती अभ्यास करत असे.

जेव्हा मी बाबांकडे आले, तेव्हा मी खूप लहान होते. त्यांनी मला शिक्षण दिलं आणि या पातळीपर्यंत पोहोचवलं. माझ्या व्यतिरिक्त त्यांनी आणखी अनेक मुलांची आयुष्यं घडवली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो गुवाहाटीला…’, शिंदेंचा पुन्हा ठाकरेंना खोचक टोला ‘डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो गुवाहाटीला…’, शिंदेंचा पुन्हा ठाकरेंना खोचक टोला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला...
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वी सोनाक्षी सिन्हा-जहीर इकबालने दिली गुड न्यूज; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
अशोक सराफ यांचा मुलगा जगतो असं आयुष्य ‘की’ प्रत्येकाला वाटेल अभिमान, नेमकं करतो तरी काय?
मी काश्मीरला जाणार…, पहलगाम हल्ल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने केलं जाहीर
Video: पाकिस्तानात सलमान खान पार्क करत आहे बाइक? कराचीमधील व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा MahaCPD प्लॅटफॉर्म – राज्यभरातील डॉक्टरांसाठी डिजिटल सीपीडीचे उपक्रम
summer hydration: उन्हाळ्यात उष्मघाताच्या समस्या होऊ नये यासाठी ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो…