सुधीर साळवी यांची उद्धव ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती
आगामी महानगर पालिकेच्या दृष्टिकोनातून शिवसेना ठाकरे गटाकडून पक्ष बांधणीत पक्षातील तरुणांना संधी देण्याची रणनिती आहे. राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी आता ठाकरे गटाचे सचिव झाले आहेत. सुधीर साळवी यांची ठाकरे गटाच्या सचिव पदी नियुक्ती झाली आहे. सुधीर साळवी यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत शिवडी विधानससभेत ठाकरे गटाकडून सुधीर साळवी इच्छुक होते. मात्र विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच मातोश्रीने संधी दिली होती.
त्यावेळी सुधीर साळवी पक्ष सोडतील अशा चर्चा सुरु होती. मात्र सुधीर साळवी ठाकरेंसोबत कायम राहिले. सुधीर साळवी हे सुरुवातीपासूनच शिवसेना पक्षाचे काम करत आहेत. सुधीर साळवी हे सध्या शिवडी विधानसभा संघटक, दक्षिण मुंबई लोकसभा समन्वयक म्हणून ठाकरे गटाकडून काम करत आहेत. 2024 लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांना देखील निवडून आणण्यात सुधीर साळवी यांचा मोठा वाटा होता.
भरीव कामाची दखल घेतली
सुधीर साळवी हे राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव देखील आहेत. सुधीर साळवी हे गेले २० वर्षे सुप्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव आहेत तसेच महर्षी दयानंद महाविद्यालय आणि ग्लेनईगल्स हॅास्पिटलचे विश्वस्त म्हणून देखील सुधीर साळवी कार्यरत आहेत. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून सुधीर साळवी यांनी पक्षाच्या सचिव पदावर आज नियुक्ती झाल्याचं पत्र प्रसिद्ध करण्यात आलंय. लोकसभा निवडणुकीत सुधीर साळवी यांनी केलेल्या भरीव कामाची दखल मातोश्रीने घेतली असल्याची शिवसेना ठाकरे गटात चर्चा आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List