Dapoli News- पतपेढीची 2 लाख 90 हजारांची फसवणूक, सोन्याचे बनावट दागिने तारण ठेवून महिला लंपास
On
चिपळूण येथील समर्थ भंडारी सहकारी पतसंस्थेच्या दापोली शाखेत सोन्याचे खोटे दागिने ठेवून त्यावर लाखोंचे कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतसंस्थेत खोटे दागिने ठेवून त्यावर 2 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक करणाऱ्या एका महिलेविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ भंडारी सहकारी पतसंस्थेच्या दापोली शाखेत शुक्रवारी २५ एप्रिल रोजी दुपारी 11 वाजता वनिता सुरेश केळकर रा. खेर्डी असे ओळखपत्र घेऊन एक महिला एका पुरुषासह पतपेढीत आली होती. ती माहिला तिचे सोन्याचे खोटे दागिने तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी आली होती. तिने आणलेले दागिने पतसंस्थेच्या अधिकृत सोनाराने तपासून ते सोन्याचेच असल्याचा अहवाल दिला. .यानंतर तिचे 54 ग्रॅम 700 मिलीग्रॅम सोने तारण ठेवून तिला 2 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज या पतसंस्थेकडून देण्यात आले. कर्जाची रक्कम घेऊन ती महिला पतसंस्थेतून निघून गेली. त्यानंतर याच पतसंस्थेच्या हर्णे शाखेतील ती पुन्हा सोने तारण कर्ज घेण्यासाठी गेली. त्यासाठी तिने तिचे ओळखपत्र दिले त्यावर सुनीता नरेश तवसाळकर असे नाव होते.
कागदपत्र तपासणारा कर्मचारीही पाळंदे येथील होता. त्यामुळे त्याने महिलेला तिचा पत्ता विचारला. यावेळी तिने मी विठ्ठल मंदिराच्या मागे आपण रहात असल्याचे त्याला सांगितले. मात्र तिचा संशय आल्याने त्या कर्मचाऱ्याने याच पतसंस्थेच्या दापोली शाखेत कार्यरत असलेला व पाळंदे हेच गाव असलेल्या कर्मचार्याला कॉल केला. आणि त्याला या महिलेचे ओळखपत्र तिची चौकशी केली. मात्र महिलेचा फोटो पाहिल्यानंतर त्यांना शंका आली. यावेळी त्यांनी या महिलेने दापोली शाखेत ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सोनाराला बोलावून पुन्हा अॅसिड तपासणी केली. तेव्हा महिलेने दिलेले सोने खोटे असल्याचे आढळले. चौकशीदरम्यान काही काळ हर्णे शाखेतील कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला हर्णे शाखेतच दागिने तपासायचे असल्याचे सांगून थांबवून ठेवले होते. मात्र त्या महिलेला संशय आला व तिने हर्णे शाखेतून पोबारा केला. मात्र तिच्यासोबत आलेल्या एका पुरुषाला ताब्यात घेवून दापोली पोलिसांच्या हवाली करण्यात आले. या प्रकरणी पतसंस्थेच्या दापोली शाखा व्यवस्थापक यांनी दापोली पोलीस ठाण्यात संशयित महिले विरोधात फसवणूकीची तक्रार दाखल केली आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
26 Apr 2025 22:05:23
हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी केवळ त्यांच्या अभिनय आणि चित्रपटांमुळेच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिल्या...
Comment List