शाळेच्या ताब्यासाठी संस्थेमधील दोन गटामध्ये तुफान हाणामारी, व्यवस्थापक अन् शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला, व्हिडिओ व्हायरल

शाळेच्या ताब्यासाठी संस्थेमधील दोन गटामध्ये तुफान हाणामारी, व्यवस्थापक अन् शिक्षिकेवर जीवघेणा हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Crime News: शाळेवर ताबा मिळवण्यासाठी शाळेच्या मैदानावर दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. दांडक्याने व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आली. या घटनेचा पोलीस जखमी व्यक्तीला उचलून नेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शिक्षणाचे मंदिर असलेल्या शाळेच्या प्रांगणात गोंधळ, शिवीगाळ, मारहाण, कपडे फाडणे व दगडफेक असे प्रकार घडले आहे. कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातील शांती हिंदी विद्यालयातील ही घटना आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोन्ही गटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

का घडली घटना

कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात असलेल्या शांती हिंदी विद्यालयाच्या ताब्यासाठी दोन संस्थेमधील दोन गटाचा वादातून तुफान राडा उफाळून आला. शाळेच्या मैदानातच व्यवस्थापकावर लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ५ एप्रिल रोजी सकाळी ही घटना घडली होती.

कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात असलेल्या शांती हिंदी विद्यालयाचे संस्थेचे स्वयंसेवक व केअरटेकर म्हणून काम करत असलेल्या विवेक श्रीकांत पांडे काम करत होते. या वेळी शाळेचे आधीच्या संस्थेत असलेले विनोद पांडे, गगन जैस्वार, नीतू पांडे, श्वेता पांडे, सुष्मा पांडे आपल्या इतर साथीदारा शाळेच्या ग्राउंडमध्ये आलसे. त्यांनी विवेक पांडे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर त्याच्या तोंडावर काळे लावून एका खोलीत डांबून ठेवले. या जीवघेणा हल्लात ते गंभीर जखमी झाले आहे.

मुख्याध्यापिकेची फिर्याद

शाळेच्या मुख्याध्यापिका सुमित्रा तिवारी यांनीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या जबाबानुसार विवेक पांडे व इतरांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यांचे कपडे फाडून लज्जास्पद कृत्य केले आणि ७ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. त्यांच्यासह अनेक महिलांनी शाळेच्या आवारात शिवीगाळ, आरडाओरडा केला. तसेच दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी दोन्ही संस्थेच्या 15 ते 20 जणांना त्याचा प्रयत्न जबरी चोरीसह अनेक कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केला. या घटनेने कल्याण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अख्खा देश फिरलेला शाहरुख खान आजपर्यंत काश्मीरला का गेला नाही? वडिलांना दिलेलं वचन पाळलं अख्खा देश फिरलेला शाहरुख खान आजपर्यंत काश्मीरला का गेला नाही? वडिलांना दिलेलं वचन पाळलं
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान त्याच्या अभिनयामुळे सर्वांच्या मनावर राज्य करतो. अभिनयाव्यतिरिक्त, शाहरुख खान त्याच्या कुटुंबावरील प्रेमासाठी आणि त्याच्या पालकांशी असलेल्या...
नारळाच्या मलईचा हेअर मास्क डॅमेज केसांसाठी ठरेल फायदेशीर, केसांच्या समस्या होतील दुर
Jammu Kashmir – काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा इशारा, गुप्तचर संस्थांकडून अलर्ट जारी
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदुस्थानी सैन्याची मोठी कारवाई, पाच दहशतवाद्यांची घरे ब्लास्ट करुन केली उद्ध्वस्त
Latur News – चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक कठड्याला धडकून उलटला; 12 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू, 40 जखमी
शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अजित पवार मुर्दाबाद…; परभणीत अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या
Mumbai News – अंधेरीतील इमारतीला भीषण आग; महिलेचा मृ्त्यू तर, सहाजण जखमी