रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेचाही 35 तासांच्या ब्लॉकमुळे 163 ट्रेन रद्द

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेचाही 35 तासांच्या ब्लॉकमुळे 163 ट्रेन रद्द

Railway Mega block : मुंबईकरांसाठी आगामी दोन-तीन दिवस अडचणीचे ठरणार आहे. मुंबईतील लोकल सेवा मेगाब्लॉकमुळे विस्कळीत होणार आहे. लोकल ट्रेनच्या अनेक फेऱ्या रद्द केल्या आहे. मध्य रेल्वे मार्गावर २७ एप्रिल रोजी तर पश्चिम रेल्वेचा २६ ते २८ एप्रिल दरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेने १६३ लोकल फेऱ्या रद्द केल्या आहे.

मध्य अन् हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

मध्य रेल्वेच्या विद्याविहार ते ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर तसेच हार्बर मार्गावरही उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. मुख्य मार्गावर विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५व्या, ६व्या मार्गावर सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत डाऊन मेल / एक्स्प्रेस विद्याविहार स्थानकात येथे डाऊन जलद मार्गावर वळविल्या जातील आणि ठाणे स्थानकात पाचव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. अप मेल-एक्स्प्रेस ठाणे स्थानकात अप जलदमार्गावर वळविल्या जातील. तसेच विद्याविहारजवळ सहाव्या मार्गावर पुन्हा वळविल्या जातील.

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि चुनाभट्टी-वांद्रे स्थानकादरम्यान अप मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजल्यापासून ते ४.१० वाजेपर्यंत आणि डाऊन हार्बर मार्गावर ११.४० वाजल्यापासून ते ४.४० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या अनेक फेऱ्या रद्द

पश्चिम रेल्वेने २६ ते २८ एप्रिल दरम्यान मेगाब्लॉक घेतला आहे. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान ३५ तासांचा मोठा ब्लॉक असणार आहे. २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजल्यापासून २८ एप्रिल मध्यरात्रीपर्यंत एकूण ३५ तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे. कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान पुल क्रमांक ६१ वर पुन्हा गर्डरिंगच्या काम करण्यात येणार आहे. यामुळे मोठा मेगाब्लॉक घेतला आहे. मेगाब्लॉकमुळे लोकल आणि मेल, एक्स्प्रेस ट्रेन सेवेवर परिणाम होणार आहे. २६ एप्रिल रोजी ७३ आणि २७ एप्रिल रोजी ९० लोकल सेवा रद्द केल्या आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो गुवाहाटीला…’, शिंदेंचा पुन्हा ठाकरेंना खोचक टोला ‘डॉक्टर नसलो तरी छोटी मोठी ऑपरेशन करतो गुवाहाटीला…’, शिंदेंचा पुन्हा ठाकरेंना खोचक टोला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना खोचक टोला लगावला...
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वी सोनाक्षी सिन्हा-जहीर इकबालने दिली गुड न्यूज; चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
अशोक सराफ यांचा मुलगा जगतो असं आयुष्य ‘की’ प्रत्येकाला वाटेल अभिमान, नेमकं करतो तरी काय?
मी काश्मीरला जाणार…, पहलगाम हल्ल्यानंतर ‘या’ अभिनेत्याने केलं जाहीर
Video: पाकिस्तानात सलमान खान पार्क करत आहे बाइक? कराचीमधील व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा MahaCPD प्लॅटफॉर्म – राज्यभरातील डॉक्टरांसाठी डिजिटल सीपीडीचे उपक्रम
summer hydration: उन्हाळ्यात उष्मघाताच्या समस्या होऊ नये यासाठी ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो…