अमित शाह यांच्या उपस्थितीत स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला गोगावलेंची दांडी, तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर

अमित शाह यांच्या उपस्थितीत स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला गोगावलेंची दांडी, तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५ वी पुण्यतिथी आणि शिवरायांच्या समाधीच्या नूतनीकरणाच्या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमानिमित्त अमित शाह यांनी रायगड किल्ल्यावर हजेरी लावली.  यानंतर अमित शाह हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जेवणासाठी देखील गेले. तटकरे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांना देखील निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. यावर आता तटकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले तटकरे? 

अमित शाह यांच्या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. अतिशय मोकळ्या पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणात संवाद झाला. जेवण हे अतिशय साध्या पद्धतीचं महाराष्ट्रीयन जेवन होतं. आमच्या विनंतीला मान देऊन शाह हे घरी आले,  शाह यांच्या उपस्थितीमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. पालकमंत्रिपदावर यावेळी कोणतीही चर्चा झाली नाही. शाह यांच्या उपस्थितीमध्ये कौटुंबीक चर्चा झाली.

माझं कर्तव्य होतं, मी भरतशेट गोगावले, उदय सामंत या सर्वांनाच निमंत्रित केलं होतं. पण गोगावले आले नाहीत. ते का आले नाहीत हे मला माहीत नाही.  पण मी माझं कर्तव्य केलं. राजकारणाच्या पलीकडे आणि एका विशिष्ट बाबींच्या पलीकडे सुद्धा सार्वजनिक जीवनामध्ये परस्परांचे संबंध राहिले पाहिजेत. स्वर्गिय चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये जी संस्कृती रूजवली आहे, ते संस्कार आमच्या सर्वांवर झाले आहेत. बाकी त्याबद्दल मी आणखी काही बोलणार नाही, असं त्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये, त्यामुळे भरत गोगावले नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

दरम्यान विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याबाबत देखील यावेळी तटकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना जेव्हा यश मिळालं तेव्हा देखील ईव्हीएमवरच मतदान झालं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखली, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून पुण्यात राडा काँग्रेस कार्यकर्त्यांनी रेल्वे रोखली, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून पुण्यात राडा
‘नॅशनल हेरॉल्ड’ प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यावरून...
बँक खात्यावर मारला डल्ला
व्हॉट्सअ‍ॅपवर बनावट प्रोफाइल फोटो लावून 30 लाख रुपये उकळले 
मला माफ करा… पण? ब्राह्मणांवर दिलेल्या विधानानंतर अनुराग काश्यप नरमला
अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा हिट-अँड-रनमध्ये मृत्यू, कुटुंबावर दुखाचा डोंगर
प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडली, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
IPL 2025 – टीम डेव्हिडची झुंजार खेळी व्यर्थ, पंजाबचा बंगळुरूवर 5 विकेटने दणदणीत विजय