Tahawwur Rana: भारतात कुठे थांबला, कोणाला भेटला…तहव्वूर राणाला मुंबई हल्ल्याबाबत एनआयएने काय, काय विचारले?

Tahawwur Rana: भारतात कुठे थांबला, कोणाला भेटला…तहव्वूर राणाला मुंबई हल्ल्याबाबत एनआयएने काय, काय विचारले?

Tahawwur Rana NIA Interrogation: मुंबईतील 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा भारतीय कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. अमेरिकेतून भारतात आल्यानंतर त्याला 18 दिवसांची एनआयए कोठडी देण्यात आली. त्यानंतर एनआयएने त्याची कसून चौकशी सुरु केली आहे. शुक्रवारी पहिल्यांदा एनआयए अधिकाऱ्यांनी तहव्वूर राणा यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. राणा याची पुन्हा शनिवारीसुद्धा चौकशी होणार आहे.

तीन तास चौकशी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएने तहव्वूर राणा याला भारतात कोणकोणाला भेटला, देशात कुठे कुठे गेला, त्याच्या संपर्कात कोण कोण होते? असे प्रश्न विचारले. परंतु तहव्वूर राणा याने अधिकाऱ्यांना सहकार्य केले नाही. आठवत नाही, असे सांगून तो उत्तरे देणे टाळत होता. शुक्रवारी राणा याची तीन तास चौकशी करण्यात आली. परंतु एकाही प्रश्नाचे त्याने व्यवस्थित उत्तर दिले नाही. चौकशी अधिकाऱ्यांनी त्याला परिवार आणि मित्राबाबतही विचारणा केली. परंतु त्याचेही त्याने उत्तर देणे टाळले.

प्रश्नांची यादी मोठीच

एनआयए मुंबई हल्ल्याशी संबंधित सर्व पैलूंवर राणा यांची चौकशी करणार आहे. प्रश्नांची यादी खूप मोठी आहे. आता चौकशीच्या पुढील टप्प्यात तहव्वूर राणा आणि त्याचा ऑन-ग्राउंड ऑपरेटिव्ह डेव्हिड कोलमन हेडली याच्या भारत भेटीदरम्यान प्रश्न असणार आहे. तसेच त्याच्या संपर्कात असलेल्या स्लीपर सेल्सबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जाईल.राणाकडून मिळालेल्या इनपूटनंतर एनआयए अधिकारी विविध एटीएस टीमसोबत संपर्क साधणार आहे. त्यांना राणा याने दिलेल्या माहितीची पडताळणी करणे आणि त्याबाबत अधिक चौकशी करण्याचे सांगण्यात येणार आहे.

तहव्वूर राणा बहुतेक ठिकाणी हेडलीसोबत गेला नाही. परंतु त्याने मुंबईत इमिग्रेशन लॉ सेंटर स्थापन करण्यात आणि इतर कव्हर व्यवस्था करण्यात हेडली याला मदत केली. तो 8 नोव्हेंबर 2008 ते 21 नोव्हेंबर 2008 दरम्यान किमान एकदा भारताला भेट देऊन हेडलीसोबत गेला होता. तहव्वूर राणा याला दिल्लीच्या एनआयए हेड क्वार्टरमध्ये ठेवण्यात आले आहे. तो ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी फक्त 12 जणांना परवानगी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अख्खा देश फिरलेला शाहरुख खान आजपर्यंत काश्मीरला का गेला नाही? वडिलांना दिलेलं वचन पाळलं अख्खा देश फिरलेला शाहरुख खान आजपर्यंत काश्मीरला का गेला नाही? वडिलांना दिलेलं वचन पाळलं
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान त्याच्या अभिनयामुळे सर्वांच्या मनावर राज्य करतो. अभिनयाव्यतिरिक्त, शाहरुख खान त्याच्या कुटुंबावरील प्रेमासाठी आणि त्याच्या पालकांशी असलेल्या...
नारळाच्या मलईचा हेअर मास्क डॅमेज केसांसाठी ठरेल फायदेशीर, केसांच्या समस्या होतील दुर
Jammu Kashmir – काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा इशारा, गुप्तचर संस्थांकडून अलर्ट जारी
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदुस्थानी सैन्याची मोठी कारवाई, पाच दहशतवाद्यांची घरे ब्लास्ट करुन केली उद्ध्वस्त
Latur News – चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक कठड्याला धडकून उलटला; 12 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू, 40 जखमी
शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अजित पवार मुर्दाबाद…; परभणीत अजित पवारांच्या ताफ्यावर फेकल्या चुन्याच्या डब्या
Mumbai News – अंधेरीतील इमारतीला भीषण आग; महिलेचा मृ्त्यू तर, सहाजण जखमी