मुलाच्या पोटात भयंकर वेदना, एक्स रे रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले!
एका 11 वर्षाच्या मुलाच्या पोटात भयंकर वेदना होत होत्या. आई-वडिलांनी त्याला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याला औषध दिलं, मात्र त्याच्या वेदना थांबत नव्हत्या. त्यामुळे डॉक्टरांनी त्याचा एक्स रे काढला. एक्स रे रिपोर्टमध्ये मुलाच्या पोटात आयताकृती वस्तू दिसली. मुलाची शस्त्रक्रिया केली असता त्याच्या पोटातून सोन्याचे बिस्किट निघाले. या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
चीनमधील जियांग्सू प्रांतात 11 वर्षीय क्यूयननं खेळता खेळता 100 ग्रॅम सोन्याचं बिस्किट गिळलं. यानंतर त्याला पोटात वेदना होऊ लागल्या. त्याला तात्काळ सुझोऊमधील वैद्यकीय केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांनी पोटाचा एक्स रे केल्यानंतर त्यात धातूची वस्तू असल्याचं दिसून आलं. यानंतर पोटाची शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी सोन्याचं बिस्किट बाहेर काढलं.
ही घटना उघडकीस येताच सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या मुलाची प्रकृती स्थिर असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List