अर्थखात्याने फक्त आर्थिक बाबीच तपासाव्यात, फायली अडकवू नयेत; देवाभाऊंची अजितदादांच्या खात्याला तंबी

अर्थखात्याने फक्त आर्थिक बाबीच तपासाव्यात, फायली अडकवू नयेत; देवाभाऊंची अजितदादांच्या खात्याला तंबी

महायुती सरकारने 100 दिवसांचा कृती आराखडा बनवून कार्यवाही सुरू केली. परंतु मुदत पूर्ण होत आल्यानंतरही बरीच कामे रखडून पडली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या कृती आराखडय़ाच्या कार्यवाहीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. उच्चस्तरीय समितीने एकदा निर्णय घेतल्यानंतर फाईल अर्थखात्यामध्येच अडकून पडणे चुकीचे असून अर्थखात्याने फक्त आर्थिक बाबीच तपासाव्यात, फायली अडकून ठेवू नयेत, अशी तंबीच यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्या अर्थ खात्याला दिली.

ऊर्जा, क्रीडा, महिला व बालविकास, शिक्षण, आरोग्य, उत्पादन शुल्क, परिवहन, वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास आदी 22 विभागांच्या 100 दिवस कार्यक्रमाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज मंत्रालयाऐवजी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली होती. या विभागांनी 100 दिवसांच्या कृती आराखडय़ासाठी ठरवलेल्या कामांपैकी 44 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. इतर कामांपैकी काही अंतिम टप्प्यात असून काही अद्याप रखडलेलीच आहेत. त्यामागची कारणे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली. अर्थखात्यामध्ये फाईल्स अडकून पडणे हे त्यातील एक प्रमुख कारण होते. उच्चस्तरीय समितीने हिरवा पंदील दिल्यानंतरही फाईल्स अडकून पडल्याचे समजताच मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची शाळा घेतली. अर्थखात्याने फक्त अर्थविषयक बाबींबाबतच निर्णय घेऊन फाईल पुढे पाठवावी, धोरणात्मक बाबींवर टिप्पणी करत बसू नये, असे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे मंत्री, राज्यमंत्री, अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आदी उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फवरून INDIA आघाडीत मतभेद ? संजय राऊत म्हणाले; आमच्यासाठी ही फाईल बंद वक्फवरून INDIA आघाडीत मतभेद ? संजय राऊत म्हणाले; आमच्यासाठी ही फाईल बंद
बहुचर्चित वक्फ बिलाला समर्थन द्यायचं की विरोध करायचा यावून इंडिया आघाडीतील पक्षांमध्येच एकमत नाहीये. संसदेने संमत केलेल्या विधेयकाला घटनाबाह्य ठरवत...
61 लाखांची फसवणूक प्रकरणी सागर कारंडेची प्रतिक्रिया, म्हणाला, तो मी नव्हेच…
जा सिमरन जा, जिले अपनी जिंदगी…जिथे शुट झालं ते स्टेशन वर्षांनुवर्षे रेल्वेची तिजोरी भरतंय, कशी ते पाहा
ते स्वत:हून माझ्याशी संपर्क…; आत्म्यांशी बोलते ही मराठमोळी अभिनेत्री, सांगितला अनुभव
सिने विश्वातील एका पर्वाचा अंत, मनोज कुमार अनंतात विलीन
युजवेंद्र चहलसोबत घटस्फोट, धनश्रीची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाली, ‘थांबून पाहणं…’
दोन लहान मुलांच्या तोंडात बोळा कोंबून आईवर बसचालक, वाहक आणि हेल्परने केला सामूहिक बलात्कार