Photo – उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘थरार’ पुस्तकाचे प्रकाशन
ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्या ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडला.
(सर्व फोटो – संदीप पागडे)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘थरार’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आलं.
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक-पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, दै. ‘सामना’चे कार्यकारी संपादक व खासदार संजय राऊत, माजी खासदार-पद्मश्री कुमार केतकर, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.
प्रभाकर पवार यांनी तीन दशकांहून अधिक काळ गुन्हे पत्रकारिता केली आहे.
त्यांनी अंडरवर्ल्ड गुन्हेगारीच्या थरारावर आधारित ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ पुस्तक लिहिले आहे. हे त्यांचे दहावे गुन्हेविषयक पुस्तक आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List