Hair Mask- केस गळतीवर हा हेअर मास्क आहे सर्वात उत्तम, केस सुंदर चमकदारही होतील
केस गळती ही सध्याच्या घडीला फार मोठी समस्या बनलेली आहे. म्हणूनच केसांवर रासायनिक शॅम्पू किंवा ट्रिटमेंट करताना जरा जपूनच करायला हवी. केसांवर ट्रिटमेंट करताना, आपण घरातील नैसर्गिक वस्तूंचा वापर करणे हे केव्हाही उत्तम. अंडी आपल्या शरीराला केवळ अंतर्गत पोषण देत नाहीत तर आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहेत. आपण घरी सहजपणे अंड्याचा हेअर मास्क बनवू शकतो. यामुळे केस गळण्यापासून तर मुक्ती मिळेलच शिवाय कोंडाही नाहीसा होईल.
अंडी आणि आवळा
दोन अंडी नीट फेटून त्यात एक चमचा आवळ्याची पावडर घालावी. त्यानंतर केसांना मुळांपासून वरपर्यंत व्यवस्थित हा मास्क लावावा. यामुळे तुमचे केस जलदगतीने वाढण्यास मदत होईल. तसेच केस मुळांपासून मजबूत आणि नैसर्गिक काळेपणा येईल आणि केस जाडही होतील.
अंडी आणि मध
दोन अंड्यांमध्ये दोन चमचे मध घाला, ते चांगले फेटून घ्या आणि ते तुमच्या केसांना लावावे. अंडी त्याच्या प्रथिनांनी केसांना मजबूत करेल आणि मध केसांना चांगले मॉइश्चरायझ करेल. ज्यामुळे तुमचे केस खूप मऊ मुलायम होतील.
अंडी, व्हिटॅमिन ई आणि नारळ तेल
अंड्यात व्हिटॅमिन ई आणि खोबरेल तेल पूर्णपणे मिसळून ते केसांसाठी खूप फायदेशीर ठरते. हा हेअर मास्क निर्जीव केसांना जिवंतपणा देण्याचे काम करतात. यामुळे स्प्लिट एंड्सची समस्या देखील दूर होते.
अंडी आणि ऑलिव्ह ऑइल
अंड्यामध्ये ऑलिव्ह ऑइल मिसळून केसांना लावल्याने केसांना पूर्ण पोषण मिळते, ज्यामुळे केस मुळांपासून मजबूत होतात आणि ते लांब आणि जाड देखील होतात.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List