बॉलिवूडचा अब्जवधी अभिनेता, शाहरुख, सलमान पेक्षा जास्त संपत्ती, कधी विकायचा ब्रश
बॉलिवूडमध्ये अभिनेता शाहरुख खान, आमिर खान आणि सलमान खान गेल्या 30 वर्षांपासून राज्य करत आहेत. बॉलिवूडचे तिन्ही खान सिनेमे आणि जाहिरातींच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावतात. पण झगमगत्या विश्वास अशी देखील एक व्यक्ती आहे जी, मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी अब्जवधींची माया कमावते. या अभिनेत्याच्या संपत्ती पुढे बॉलिवूडच्या तिन्ही खानची संपत्ती फेल आहे. सध्या सध्या सर्वत्र सेलिब्रिटींच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे.
सध्या ज्या सेलिब्रिटीची चर्चा रंगली आहे, त्याचं नाव चित्रपट निर्माता आणि उद्योजक रॉनी स्क्रूवाला आहे. ज्यांनी 2025 च्या फोर्ब्स अब्जाधीशांच्या यादीत 1.5 अब्ज (12000 कोटींहून अधिक) संपत्तीसह स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. सध्या सर्वत्र रॉनी स्क्रूवाला याच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे.
रॉकी स्क्रूवालाची संपत्ती बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्या एकत्रित संपत्तीपेक्षा जास्त आहे. एका रिपोर्टनुसार, इंडस्ट्रीतील या तिन्ही खानांची एकूण संपत्ती 1.38 अब्ज डॉलर्स आहे. यासह रॉनी स्क्रूवाला बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला आहे.
शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांनी सिनेमांमध्ये काम करून पैसे कमवले. दरम्यान, रॉनी स्क्रूवाला याने सिनेमा निर्मिती आणि इतर व्यवसायाच्या माध्यमातून अब्जवधींची माया कमावली आहे. मुंबईत जन्मलेल्या रॉनी स्क्रूवाला याने शिक्षणानंतर 1970 च्या दशकात टूथब्रश उत्पादन व्यवसायात करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने 1980 च्या दशकात केबल टेलिव्हिजन व्यवसायात प्रवेश केला आणि नंतर 1990 मध्ये यूटीव्हीची स्थापना केली.
खान ब्रदर्स VS स्क्रूवाला
रॉकी याने ‘रंग दे बसंती’, ‘जोधा अकबर’ यांसारख्या अनेक प्रसिद्ध सिनेमांची निर्मिती केली आहे. 2012 मध्ये त्याने यूटीव्ही कंपनीला डिस्नेला एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किंमतीत विकले. यानंतर, 2017 मध्ये, तो RSVP Movies सह चित्रपट निर्मितीमध्ये परतला आणि उरी: द सर्जिकल स्ट्राइक आणि केदारनाथ सारखे हिट सिनेमे बॉलिवूडला दिले. पण रॉकी याचं अधिक उत्पन्न इतर उद्योगांमधून होत आहे. अनेक कंपन्यांमध्ये रॉकीने गुंतवणूक देखील केली आहे.
खान अभिनेत्यांची संपत्ती
बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याकडे 6500 कोटींची संपत्ती आहे. अभिनेता सलमान खान याच्याकडे 390 मिलियन म्हणजे 3000 कोटी रुपयांची संपत्ती आहे. अभिनेता आमिर खान याच्याकडे 220 मिलियन म्हणजे 1800 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सध्या सर्वत्र खान ब्रदर्स आणि रॉकी स्क्रूवाला याच्या संपत्तीची चर्चा रंगली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List