“हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढं सोपं नाही”, कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावणाऱ्या कृषिमंत्र्यांवर रोहित पवारांची टीका

“हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढं सोपं नाही”, कर्जमाफीवरून शेतकऱ्यांना सुनावणाऱ्या कृषिमंत्र्यांवर रोहित पवारांची टीका

हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही अशा शेतकऱ्यांबद्दलच्या वक्तव्यावरून काही महिन्यांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का, असा सवाल त्यांनी शेतकऱ्यांना केल्याने पुन्हा संताप निर्माण झाला आहे. याचा व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

रोहित पवार यांनी शनिवारी आपल्या एक्स अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. ‘कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो शेतकऱ्यांना मिळत नाही हे कदाचित आपल्याला ज्ञात नसावे. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याएवढे सोपे नाही. मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रम्हज्ञान देण्याची गरजंच नाही’, अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली.

हे वाचा – माणिकराव कोकाटे म्हणजे कृषिक्षेत्रातील कुणाल कामरा झालेत; रोज शेतकऱ्यांची खिल्ली उडवताहेत, संजय राऊत यांचा हल्लाबोल

‘रोज कोट बदलणाऱ्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याचा फाटलेला सदरा दिसत नसला तरी आपल्या वादग्रस्त संवेदनांचं प्रदर्शन करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल यावर लक्ष केंद्रित केलं तर अधिक बरं होईल. राजकीयदृष्ट्या थोडक्यात वाचला आहात त्यामुळे जरा जपून’, असा इशाराही त्यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीत...
वक्फ बोर्ड बिल : हर्षवर्धन सपकाळ यांच्या आरोपांना अजितदादांचे एका वाक्यात उत्तर म्हणाले की…
मोठी बातमी! ‘माझ्या मुलीला…’, निकाल लागताच करुणा शर्मांचा पहिल्यांदाच सनसनाटी आरोप
उदय सामंतांवर उधळलेल्या खोट्या नोटा जाळल्या, टीकेची झोड उठताच पळापळ
इंडिगो विमानात 5 वर्षाच्या मुलीची सोनसाखळी चोरल्याचा आरोप, महिला क्रू मेंबरविरोधात गुन्हा दाखल
कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांनी केली मोठी मागणी
मुंबईकर नोकरदारांना सहा दिवस घरचा डबा बंद, काय आहे कारण?