औरंजेबाला तुम्हीच जिंवत केलं, आता मी… एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सरकारवर साधला निशाणा

औरंजेबाला तुम्हीच जिंवत केलं, आता मी… एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी सरकारवर साधला निशाणा

Imtiaz Jaleel on controversy of Aurangzeb tomb kabar: दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सिनेमात औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केलेले अन्याय मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले. ज्यामुळे सर्वत्र वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. एवढंच नाहीतर, नागपुरात तर राडे झाले. आणि राज्यात अशांतता माजली. औरंगजेबाच्या कबरीवरून देखील अनेक राडे झालेय. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी काही हिंदू संघटना आक्रमक झाल्या. दरम्यान एका कार्यक्रमात औरंजेबाला तुम्हीच जिंवत केलं… असं वक्तव्य एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी यांनी केलं.

सरकारवर निशाणा साधत एमआयएमचे नेते इम्तियाज जलील म्हणाले, ‘मागच्या 70 वर्षांमध्ये औरंगजेबाबद्दल लोकांनी जेवढं वाचलंय, तेवढं अनेकांना गेल्या एका महिन्यात वाचलं. औरंगजेबाला तुम्ही जिवंत केलं. आता मी पाण्याचा प्रश्न विचारणार नाही. माझ्या शहरात आजही आठ आठ दिवसांनंतर पाणी येत. रिपोर्टर आला त्याने मला विचारलं, ‘औरंगजेबाबाबत तुम्हाला काय म्हणायचं आहे?’ मी त्याला सांगितलं पाण्याचा प्रश्न सोडवा आधी… याबाबतीत कोणीच नाही विचारणार…संतोष देशमुख यांची जेव्हा हत्या झाली. जेव्हा ते पाणी मागत होते, तेव्हा ही क्रुरता नव्हती का…’ असं देखील जलील म्हणाले.

ही बातमी सुद्धा वाचाछावा सिनेमा बनवला, त्याऐवजी तुम्ही…, सिनेमाबद्दल इम्तियाज जलील यांचं स्पष्ट वक्तव्य

होळीच्या दिवशी गालबोट नाही लागलं म्हणून…

होळीच्या दिवशी जुम्मा की नमाज… मुसलमान बाहर निकलेगा आणि हिंदू होली खेलते रहेगा… अशी वातावरण निर्मिती करण्यात आली होती, की आता महाराष्ट्रात काय होणार… मुसलमान नमाज पठण करण्यासाठी निघणार आण एकीकडे हिंदू होळी खेळण्यासाठी…

तर त्या वेळी देखील मी सांगितलं होतं. मला माझ्या महाराष्ट्रावर विश्वास आहे. मुसलमान नमाज अदा करणार आणि माझे हिंदू बांधव होळी देखील त्याच दिवशी खेळणार… पण तेव्हा काही झालं नाही. कुठेही गालबोट नाही लागलं. मी आजही पोलिसांना सांगतो, जे कोणी कायद्याचे नियम पाळत नसतील, त्यांच्यावर कारवाई करा. पण कृपा करून एकतर्फी कारवाई करु नका… असं देखील इम्तियाज जलील म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खडसे, महाजन वादात आता सदावर्तेंची उडी; एकनाथ खडसेंना दिला थेट इशारा खडसे, महाजन वादात आता सदावर्तेंची उडी; एकनाथ खडसेंना दिला थेट इशारा
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गिरीश महाजन यांचे एका...
पहिले मित्राची बहिण, मग वहिनी; एकाच घरातील दोघींवर प्रेम… अभिनेता आता फिरतोय एकटा
तीन वेळा धोका, लग्न मोडलं, नैराश्यामध्ये जाऊन पॅनिक अटॅक; युजवेंद्र चहलच्या कथित गर्लफ्रेंडसोबत नेमकं काय झालं?
सेक्स सीन…; सई ताम्हणकरच्या ‘हंटर’ सिनेमाविषयी दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
मच्छर नेमके कोणाला चावायचे याची निवड कशी करतात? काय आहे या मागचे शास्र ?
Acid Attack – भाजप नेत्याच्या मुलीवर जीवघेणा हल्ला, घराच्या खिडकीतून अ‍ॅसिड फेकून आरोपी फरार
IPL 2025 ठरलं तर…! मुंबईच्या गोलंदाजीची धार वाढणार, जसप्रीत बुमराह RCB विरुद्ध मैदानात उतरणार