आंबा डागाळला; मोगरा काळवंडला; शहापूर, मोखाडा तालुक्याला अवकाळी गारपिटीचा तडाखा

आंबा डागाळला; मोगरा काळवंडला; शहापूर, मोखाडा तालुक्याला अवकाळी गारपिटीचा तडाखा

शहापूर तसेच मोखाडा तालुक्यासह विविध भागांना आज अवकाळी गारपिटीचा जोरदार तडाखा बसला. या अस्मानी संकटामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. त्याशिवाय ग्रामीण भागातील जनजीवनच ठप्प झाले. एकीकडे घरांची पडझड होत असतानाच दुसरीकडे आंबा आणि मोगऱ्याचीदेखील वाताहात झाली. शहापूर व मोखाडा तालुक्यातील आंबा अवकाळीमुळे डागाळला असून मोगरा काळवंडला आहे. या पावसामुळे आंबा व मोगरा उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. मोठ्या कष्टाने आंब्याच्या झाडांची निगा राखली, मोगराही जीव लावून पिकवला पण डोळ्यांदेखत या पिकांची अक्षरशः माती झाली. अवकाळीने शेतकऱ्यांच्या डोळ्यांतून वहात आहे तो फक्त अश्रूचा पाऊस.

गेल्या काही दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाला आणि सर्वत्र मळभ दाटून आले. आज सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह गारपिटीला सुरुवात झाली आणि शहापूर, मोखाडा, ठाण्याचा ग्रामीण भाग तसेच रायगड जिल्ह्यातील खालापूर, चौक, कर्जत, रसायनी, माथेरान या भागांत होत्याचे नव्हते झाले. शहापूर तालुक्यातील शिसवली, दहिगाव, अजनूप, खर्डी, दळखण, तळवडा येथे मोगऱ्याचे उत्पादन केले जाते. सुमारे अडीचशे शेतकरी या मोगऱ्यावर अवलंबून आहेत. कर्ज तसेच उसनवारी करून शेतकऱ्यांनी मोगरा पिकवला पण आजच्या अवकाळीने मोगऱ्याची फुले गळून पडली. मोगऱ्याची झालेली माती पाहून शेतकऱ्यांचे अवसानही गळून पडले आहे.

उपासमारीची वेळ

मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ, मुरांडा, हिरवे-पिंपळपाडा या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सुमारे शंभर हेक्टरवर मोगऱ्याचे उत्पादन घेतले जाते. येथील सुवासिक मोगऱ्याला दादर, कल्याण, ठाणे अशा बाजारपेठांमध्ये मोठी मागणी असते. पण आजच्या पावसामुळे या मोगऱ्याची अक्षरशः वाट लागली आहे. मोगऱ्याबरोबरच शहापूर व मोखाड्यातील आंबा बागायतदारांचेही मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे आंबे जमिनीवर कोसळले. आता त्यावर डाग पडू लागल्याने हे आंबे फेकून द्यावे लागणार आहेत. शहापुरातील वेळूक, वाशाळा, टेंभा, दहिगाव, भातसानगर, बिरवाडी, डोळखांब, वासिंद परिसर येथे एक हजाराहून अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा व मोगरा उत्पादक शेतकऱ्यांवर या अवकाळीने उपासमारीची वेळ आली आहे.

■ रायगड जिल्ह्यातील विविध भागांत विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसामुळे त्रेधातिरपीट उडाली. खालापुरातील वीटभट्टी व्यावसायिकांचे अतोनात नुकसान झाले. तर शेतीचीही वाट लागली असून अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
■ या अवकाळीचा फटका ठाणे, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या परिसरालाही बसला. ठाण्यातील नौपाडा, मानपाडा व पवारनगर येथे तीन झाडे कोसळली तर तीन दुचाकींचेही नुकसान झाले. अंबिवलीतही पाच गड्यांवर झाडे पडली.

गातातोंडाशी आलेला आंखा पडल्याने आमची मेहनत वाया गेली आहे. त्यामुळे आमचे आर्थिक नुकसानही झाले आहे. आंबा बागांचे पंचनामे करुन सरकारने नुकसानभरपाई द्यावी.

उमेश धानके, आंबा बागायतदार

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दहिसरमध्ये साकारले गावदेवीचे जुने मंदिर दहिसरमध्ये साकारले गावदेवीचे जुने मंदिर
दहिसरवासीयांचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान असलेल्या गावदेवीचा वार्षिक उत्सव शुक्रवारी संपन्न झाला. त्यानिमित्त दहिसर गावठाण प्रवेशद्वाराजवळ जुन्या गावदेवी मंदिराची प्रतिकृती...
अंधेरीत ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पंतप्रधान मोदी यांचा ‘श्रीलंका मित्र विभूषण’ पुरस्काराने सन्मान
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
वक्फ बोर्ड बिल : हर्षवर्धन सपकाळ यांच्या आरोपांना अजितदादांचे एका वाक्यात उत्तर म्हणाले की…
मोठी बातमी! ‘माझ्या मुलीला…’, निकाल लागताच करुणा शर्मांचा पहिल्यांदाच सनसनाटी आरोप
उदय सामंतांवर उधळलेल्या खोट्या नोटा जाळल्या, टीकेची झोड उठताच पळापळ