छावा सिनेमा बनवला, त्याऐवजी तुम्ही…, सिनेमाबद्दल इम्तियाज जलील यांचं स्पष्ट वक्तव्य
Imtiaz Jaleel on chhaava: दुख इस बात का नही की धर्म का धंदा चल रहा है…, ‘छावा’ सिनेमाबद्दल इम्तियाज जलील यांचं स्पष्ट वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा 14 फेब्रुवारी 2025 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. सिनेमा पहिल्यानंतर औरंगजेबाच्या क्रुरतेनं सर्वांचं लक्ष वेधलं आणि राज्यात अशांतता माजली. औरंगजेबाच्या कबरीवरून देखील अनेक राडे झाले. औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी काही हिंदू संघटना आक्रमक झाल्या. दरम्यान एका कार्यक्रमात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.
‘सिनेमा बनवायचाच होता तर दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे किंवा थ्री इडियटसारखा बनवायचा होता. तीन तास सर्वांचं मनोरंजन देखील झालं असतं. तुम्ही सिनेमा बनवला आणि कशी क्रुरता होती दिखवली. मी सिनेमा पाहिलेला नाही. पण महाराष्ट्र विधानसभेमध्ये मुद्दे होते शेतकऱ्यांचे, लाडक्या बहिणींना आश्वासन दिलं होतं 2100 रुपये देण्याचं, नोकऱ्यांचा प्रश्न आहे… विधानसभा यासाठी आहे. पण सर्व आमदार, मंत्री कुठे गेले? तर सिनेमा पाहण्यासाठी गेले. मग हा सिनेमा तुम्हाला राजकीय फायदा देतो म्हणून तुम्ही सगळे सिनेमा पाहण्यासाठी गेले…’
पुढे जलील म्हणाले, ‘मी एक प्रश्न विचारु का? लोकांना वाईट वाटेल 2023 मध्ये बीबीसीने एक डॉक्युमेंट्री तयार केली होती. ‘इंडिया दी मोदी इफेक्ट’ गुजरातमध्ये काय काय घडलं होतं, त्यावर आधारित ती डॉक्युमेंट्री होती. ती डॉक्युमेंट्री बॅन करण्यात आली. आपण म्हणतो फ्रीडम ऑफ स्पीच आहे. तर ती डॉक्युमेंट्री का नाही सर्वांना पाहू दिली. ती डॉक्युमेंट्री पाहाण्याचा अधिकार तुम्ही मला का दिला नाही…’ असा प्रश्न उपस्थित करत देशात जे काही चांगलं वाईट झालं आहे सुरु आहे ते सर्व लोकांना पाहू द्या..’ असं देखील जलील म्हणाले.
‘छावा हा एक प्रपोगंडा सिनेमा आहे, असं तुम्हाला वाटतं का?’ या प्रश्नावर जलील म्हणाले, ‘छावा सिनेमा पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहे, त्या पहिल्यानंतर असं वाटतं की, दुख इस बात का नही की धर्म का धंदा चल रहा है, दुख इस बात का है इस धर्म के धंदे मे पढा लिखा भी अंधा हो रहा है. जे शिकलेले लोक आहेत त्यांना देखील असं वाटतं की 400 वर्षांपूर्वी औरंगजेबाने जे काही केलं, त्याचा हिशोब इम्तियाज जलीलकडे मागू…’ इम्तियाज जलील यांचं हे वक्तव्य सध्या तुफान चर्चेत आहे…
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List