दहिसरमध्ये साकारले गावदेवीचे जुने मंदिर
दहिसरवासीयांचे श्रद्धास्थान व जागृत देवस्थान असलेल्या गावदेवीचा वार्षिक उत्सव शुक्रवारी संपन्न झाला. त्यानिमित्त दहिसर गावठाण प्रवेशद्वाराजवळ जुन्या गावदेवी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतिकृती इतकी हुबेहूब आहे की, दहिसरमधील ग्रामस्थ मंदिराच्या जुन्या आठवणीत रमून गेले. ही प्रतिकृती पाहण्यासाठी भाविकांची तुडुंब गर्दी होत असून हा देखावा येत्या सोमवारपर्यंत नागरिकांना पाहता येणार आहे. संदीप मंडप डेकोरेटरचे संचालक भालचंद्र मोतीराम म्हात्रे व निखिल भालचंद्र म्हात्रे यांनी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List