ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे आयफोन महागणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरात टॅरिफ लावला आहे. यामध्ये सर्वात जास्त टॅरिफ चीनवर लावण्यात आल्याने आयफोनच्या किमती वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आयफोनची निर्मिती सर्वात जास्त चीनमधून केली जाते, परंतु अमेरिकेने चीनवर तब्बल 54 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे आता जास्तीचा वाढलेला खर्च अॅपल स्वतः सोसणार की, तो ग्राहकांच्या माथी मारणार हे लवकरच स्पष्ट होईल. जर अॅपलने वाढलेल्या किमती ग्राहकांच्या माथी मारल्यास ग्राहकांना आयफोन खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागतील. अॅपल कंपनी दरवर्षी 22 कोटींहून अधिक आयफोनची विक्री करते. यामध्ये अमेरिका, चीन, हिंदुस्थान आणि युरोपमध्ये आयफोनचा सर्वात जास्त ग्राहकवर्ग आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List