ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून जुहू येथील पवनहंस स्मशानभूमीत आणले. येथे त्यांना 21 बंदुकीच्या फैरींची सलामी देण्यात आली. मुलगा कुणाल गोस्वामीने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. कुटुंबिय, बॉलीवूड सेलिब्रेटी आणि चाहत्यांनी साश्रुनयनांनी या लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप दिला.
तब्बल पाच दशकांहून अधिक काळ मोठा पडदा गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे शुक्रवारी सकाळी अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलीवूडसह सिने रसिकांवर शोककळा पसरली. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव रुग्णालयातून घरी नेण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी फुलांनी रुग्णवाहिका सजवली होती. त्यावर त्यांचा जुना पह्टो लावला होता. त्यानंतर मनोज कुमार यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून त्यांना राज्य सन्मानासह 21 बंदुकीच्या फैरींची सलामी देण्यात आली. मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रेम चोप्रा, सलीम खान, अरबाज खान, सुभाष घई, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, राजपाल यादव यांच्यासह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List