पंतप्रधान मोदी यांचा ‘श्रीलंका मित्र विभूषण’ पुरस्काराने सन्मान
श्रीलंका सरकारने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कारा’ने सन्मानित केले. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा पुमारा दिसानायके यांच्या हस्ते मोदी यांना पदक देऊन गौरव करण्यात आला. आपल्या देशासोबत चांगले संबंध असलेल्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना श्रीलंकेकडून या पुरस्काराने गौरविले जाते. या पुरस्काराने सन्मानित होणे हे माझ्यासाठीच नाही तर 140 कोटी हिंदुस्थानींसाठी सन्मानाची गोष्ट आहे, असे उद्गार मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर काढले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List