पॉवरफुल पासपोर्टमध्ये हिंदुस्थान 148व्या स्थानी, आयर्लंडचा पासपोर्ट जगात ‘भारी’

पॉवरफुल पासपोर्टमध्ये हिंदुस्थान 148व्या स्थानी, आयर्लंडचा पासपोर्ट जगात ‘भारी’

जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीत प्रथमच आयर्लंडने अव्वल क्रमांक पटकावला आहे, तर हिंदुस्थानला 147व्या स्थानावरून 148व्या स्थानावर समाधान मानावे लागले.

टॅक्स आणि इमिग्रेशन कन्सल्टन्सी नोमॅड कॅपिटलिस्टने 2025 च्या क्रमवारीत आयर्लंडला पहिला क्रमांक दिला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हिंदुस्थानचा पासपोर्ट आणखी खाली घसरला आहे. या क्रमवारीसाठी नोमॅड कॅपिटलिस्टने जगभरातील 199 देशांचा अभ्यास केला. शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी ठरवताना पाच मुख्य घटक विचारात घेण्यात आले.

व्हिसामुक्त प्रवास, कर प्रणाली, देशाची प्रतिमा, दुहेरी नागरिकत्व सुविधा आणि व्यक्ती स्वातंत्र्य या घटकांच्या आधारे आयर्लंडचा पासपोर्ट जगात सगळ्यात पॉवरफुल ठरला. साधारणपणे पासपोर्टची ताकद किती देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास मिळतो यावरून मोजली जाते. मात्र नोमॅड कॅपिटलिस्टने व्हिसा, ई-व्हिसा सुविधा, वैयक्तिक स्वातंत्र्य यांसारख्या इतर पैलूंचे मूल्यांकन करून ही क्रमवारी ठरवली.

आयर्लंड अव्वल स्थानी

आयर्लंडचा पासपोर्ट 109 च्या नोमॅड पासपोर्ट स्कोअरसह पहिल्या क्रमांकावर आहे. एक मजबूत आंतरराष्ट्रीय प्रतिमा, व्यवसायासाठी अनुकूल कर धोरण आणि नागरिकत्व धोरण या तीन कारणांमुळे आयर्लंडने अव्वल स्थान गाठले आहे. तसेच या कारणांमुळे आयर्लंडच्या नागरिकांना युरोपियन युनियन आणि ब्रिटनमध्ये व्हिसामुक्त प्रवास करण्याची परवानगी मिळते.

हिंदुस्थानची घसरण

हिंदुस्थानच्या पासपोर्टची 147 व्या स्थानावरून 148 व्या स्थानी घसरण झाली आहे.

जगातील टॉप पासपोर्ट

आयर्लंड, स्वित्झर्लंड, ग्रीस, पोर्तुगाल, माल्टा, इटली, लक्झेंबर्ग, फिनलंड, नॉर्वे, संयुक्त अरब अमिराती, न्यूझीलंड, आइसलँड.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

वक्फ बोर्ड बिल : हर्षवर्धन सपकाळ यांच्या आरोपांना अजितदादांचे एका वाक्यात उत्तर म्हणाले की… वक्फ बोर्ड बिल : हर्षवर्धन सपकाळ यांच्या आरोपांना अजितदादांचे एका वाक्यात उत्तर म्हणाले की…
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत खूप मोठ्या प्रमाणात असंतोष पाहायला मिळत आहे.चुकीची घटना घडली आहे, निश्चितपणे काहींच्या चुका झाल्या आहेत. मी आणि...
मोठी बातमी! ‘माझ्या मुलीला…’, निकाल लागताच करुणा शर्मांचा पहिल्यांदाच सनसनाटी आरोप
उदय सामंतांवर उधळलेल्या खोट्या नोटा जाळल्या, टीकेची झोड उठताच पळापळ
इंडिगो विमानात 5 वर्षाच्या मुलीची सोनसाखळी चोरल्याचा आरोप, महिला क्रू मेंबरविरोधात गुन्हा दाखल
कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक; हर्षवर्धन सपकाळ यांनी केली मोठी मागणी
मुंबईकर नोकरदारांना सहा दिवस घरचा डबा बंद, काय आहे कारण?
राज ठाकरे ते शिंदे व्हाया फडणवीस, राऊतांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले वाचमनच्या…