शिवसेनेच्या नादाला लागू नका, आम्ही दिल्लीत जाऊन कुणाची बुटचाटेगिरी करत नाही; संजय राऊत यांचा गद्दार मिंधे-अजित पवार गटावर निशाणा
संसदेत वक्फ विधेयकावर बोलताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी शिवसेनेवर रंग बदलल्याचा आरोप केला होता. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर ठामपणे उभे आहोत, असे राऊत म्हणाले.
प्रफुल्ल पटेल हे गृहस्थ व्यापारी आहेत. व्यापार करणे अपराध नाही, पण हे डरपोक आहेत. डरपोक लोकांशी मला बोलायचे नाही. संसदेत त्यांच्या सुदैवाने त्यांचा माइक चालू होता आणि आम्ही विरोधी पक्षात असल्याने माझा माइक बंद होता. नाही तर माझे उत्तर रेकॉर्डवर आले असते. पण भाजपच्या आयटी सेलने जणू प्रफुल्ल पटेल हे फार मोठे योद्धे आहेत. दुसऱ्या महायुद्धात जर्मनीत जाऊन युद्ध जिंकून आले आहेत आणि मग भंडाऱ्यात उतरले असे चित्र दाखवले आहे. खरे तर हे गांडू लोक आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
आम्हाला रंग बदलला म्हणत होते. रंग कुणी बदलला? आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या व्यासपीठावर ठामपणे उभे आहोत. पवार साहेबांना सोडून पळून कोण गेले? बापाच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे शिवसेनेच्या नादी लागू नका, असा इशारा राऊत यांनी गद्दार मिंधे गटाला आणि अजित पवार गटाला दिला.
गद्दार शिंदे आणि गद्दार राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेनेच्या नादी लागू नये. सुखात भांडी घासा, चपला, बुट पॉलिश करत रहा. आमच्या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही दिल्लीत जाऊ कुणाची बुटचाटेगिरी करत नाही. आम्ही सत्तेचे भुकेले, हपापलेले नाही. सत्ता येते आणि सत्ता जाते हे हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य आम्हाला मान्य आहे, असेही राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List