अमेरिकेच्या टॅरिफने चीन, ऑस्ट्रेलियाची चांदी; जागतिक मंदीच्या सावटात मोठ्या संधीची चाहूल
अमेरिकेनं जगभरातील अनेक राष्ट्रांवर टॅरिफ लादल्यानं जागतिक मंदीच्या सावटाची चर्टा होत आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या टॅरिफच्या धोरणावर ठाम असून त्याचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार असल्याचा दावा ते करत आहेत. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेसह जगातील शेअर बाजारात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात घसरण झाली. या अनिश्चततेच्या वातावरणात चीन आणि ऑस्ट्रेलियाला मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. जागितक मंदीच्या काळात त्यांच्याकडे मोठी संधी चालून आली आहे.
ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे जगभरातील शेअर बाजाराला मोठा फटका बसला असून सुरक्षित गुतंवणूक म्हणून अनेक गुंतवणूकदार आता सोन्याकडे वळले आहेत. तसच जागतिक अस्थिरता आणि मंदीच्या सावटामुळे सोन्याच्या दरात तेजी दिसून येत आहे. देशात शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 91१ हजार रुपयांवर पोहोचला. सोन्याचे दर लवकरच एका लाखाचा टप्पा पार करतील, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सोन्याचे दर वाढत असल्याची हीच संधी साधत मोठा फायदा करून घेण्याची चाहूल चीन आणि ऑस्ट्रेलियाला लागली आहे.
डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच जागतिक अस्थिरतेत वाढ झाली आणि सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्यास सुरुवात झाली. आता ट्रम्प यांनी ट्ररिफचे हत्यार उपसल्याने शेअर बाजार कोसळला आहे. त्यामुळे जागतिक मंदीचा धोका निर्माण झाला आहे. अशा काळात सोने ही महत्त्वाची आणि सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळे जगभरातील केंद्रीय बँकाही मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करत आहेत.
चीनच्या ईशान्य प्रांतात 1000 टन सोन्याचा प्रचंड साठा शोधल्याचा दावा चीननं केला आहे. यापूर्वीही मागील वर्षी चीनने 80 अब्ज डॉलर किमतीच्या सोन्याच्या साठ्याचा शोध लागल्याचं सांगितलं होतं. दुसरीकडे, सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलियानेही या संधीचा फायदा घेत सोन्याचं उत्खनन वेगानं सुरू केलं आहे.एखाद्या देशाकडे मोठ्या प्रमाणात सोने असेल तर तो जगातील आर्थिक संकटाचा सहज सामना करू शकतो.
चीन हा जगातील सर्वात मोठा सोन्याचा उत्पादक देश असून 2024 मध्ये 380 टन सोन्याचं उत्पादन झालं. मात्र, एकूण सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत चीन अजूनही दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियापेक्षा मागे आहे. आता सापडलेला सोन्याचा साठा चीनला सोन्याच्या उत्पादनात आघाडी राखण्यास मदत करू शकतो. सोन्याचा हा साठा चीनसाठी मंदीत मोठी संधी ठरणार आहे. तसेच जगात सोन्याची झपाट्यानं होणारी मागणी लक्षात घेता ऑस्ट्रेलियानं आपल्या सोन्याच्या उत्पादनात मोठी वाढ केली आहे. 2030 पर्यंत ऑस्ट्रेलिया सोने उत्पादनात चीन आणि रशियासारख्या देशांना मागे टाकेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे ट्रम्प यांचे टॅरिफ अमेरिकेपेक्षा चीन आणि ऑस्ट्रेलियासाठी मोठी संधी ठरू शकते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List