Jammu Kashmir – आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न फसला, बीएसएफकडून पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा
जम्मू-काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरुन हिंदुस्थानात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाकिस्तानी नागरिकाचा प्रयत्न बीएसएफने हाणून पाडला. आरएस पुरा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून एका पाकिस्तानी घुसखोर हिंदुस्थानात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होता. बीएसएफने त्या पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा केला आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात बीएसएफ जवानांना शुक्रवारी मध्यरात्री आरएस पुरा सेक्टरमध्ये अब्दुलिया सीमा चौकीजवळ संशयास्पद हालचाली दिसल्या. एक व्यक्ती पाकिस्तानातून हिंदुस्थानी सीमेकडे येताना जवानांना दिसला. जवानांनी इशारा दिला, मात्र याकडे दुर्लक्ष करत तो हिंदुस्थानच्या सीमेच्या दिशेने चालत राहिला. अखेर जवानांनी त्याच्यावर गोळी झाडली, यात तो जागीच ठार झाला.
ठार केलेल्या घुसखोराकडे कोणतेही हत्यार किंवा घातक सामग्री आढळून आली नाही. घुसखोराची ओळख पटवण्याचा आणि त्याचा हेतू जाणून घेण्याचे प्रयत्न जवानांकडून सुरू आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List