अलविदा… मनोज कुमार; लाहोरमध्ये जन्मले पण ‘भारत कुमार’ बनले

अलविदा… मनोज कुमार; लाहोरमध्ये जन्मले पण ‘भारत कुमार’ बनले

हरिकृष्ण गिरी गोस्वामी म्हणजेच मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 लाहोरमधील अबोटाबाद येथे झाला. दिल्लीतील निर्वासित छावणीत त्यांनी फाळणीच्या जखमा फारच जवळून अनुभवल्या. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची खूप आवड होती. अशोक पुमार, दिलीप कुमार आणि कानन काwशल हे त्यांचे आवडते कलाकार होते. त्यांच्या चित्रपटांनी प्रभावित होऊन त्यांनी स्वतःचे नाव हरिकृष्णवरून मनोज कुमार असे बदलले होते. ‘मी हरिकृष्णला मनोज कुमार बनवले, पण मनोज कुमारला ‘भारत कुमार’ बनवले आपल्याच जनतेने!’ असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

लाइट टेस्टिंगसाठी कॅमेऱ्यासमोर उभे राहिले अन् रोल मिळाला

मनोज कुमार यांना चित्रपटात भूमिका कशी मिळाली याचीही एक रंजक किस्सा आहे. एके दिवशी मनोज कुमार कामाच्या शोधात फिल्म स्टुडिओमध्ये फिरत असताना त्यांना एक व्यक्ती दिसली. आपण कामाच्या शोधात असल्याचे मनोज यांनी त्यांना सांगितले. त्या व्यक्तीच्या ओळखीवरून मनोज यांना चित्रपटाच्या शूटिंगसाठी वापरले जाणारे लाइट्स आणि इतर उपकरणे वाहून नेण्याचे काम मिळाले. पुढे त्यांना चित्रपटांमध्ये सहाय्यक म्हणून काम मिळू लागले. एकदा मनोज कुमार लाइट टेस्टिंगसाठी नायकाच्या जागी उभे राहिले. कॅमेऱयाचा प्रकाश पडताच त्यांचा चेहरा इतका आकर्षक दिसत होता की, एका दिग्दर्शकाने त्यांना ‘फॅशन’ (1957) चित्रपटात एक छोटीशी भूमिका दिली. त्या भूमिकेमुळे मनोज कुमार यांना ‘कांच की गुडिया’ (1960) या चित्रपटात मुख्य भूमिका देण्यात आली. पहिला यशस्वी चित्रपट दिल्यानंतर मनोज यांनी ‘रेशमी रुमाल’, ‘चांद’, ‘बनारसी ठग’, ‘गृहस्थी’, ‘अपने हुए पराये’, ‘वो काौन थी’ यांसारखे अनेक बॅक टू बॅक हिट चित्रपट दिले.

लालबहादूर शास्त्राr यांच्या सांगण्यावरून चित्रपट बनवला

मनोज पुमार यांनी 1965 साली आलेल्या ‘शहीद’ या देशभक्तिपर चित्रपटात स्वातंत्र्यसैनिक शहीद भगतसिंग यांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यातील ‘ए वतन, ए वतन हमको तेरी कसम’, ‘सरफरोशी की तमन्ना’ आणि ‘मेरा रंग दे बसंती चोला’ या गाण्यांना पसंती मिळाली. लालबहादूर शास्त्राr यांना हा चित्रपट खूप आवडला. त्यांनी ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेवर मनोज यांना चित्रपट बनवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मनोज यांनी ‘उपकार’ (1967) हा चित्रपट बनवण्यास सुरुवात केली. एकदा मनोज कुमार यांनी मुंबईहून दिल्लीला जाणाऱया राजधानी ट्रेनमध्ये अर्धा चित्रपट लिहिला आणि उरलेला अर्धा परतताना लिहिला. लालबहादूर शास्त्राr यांच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट शास्त्री यांनी दाखवता आला नाही, याबद्दल त्यांना खंत वाटत होती. ‘उपकार’नंतर मनोज कुमार यांनी दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कारकीर्दीची दुसरी इनिंग सुरू केली. नंतर त्यांनी ‘पूरब और पश्चिम’’, ‘रोटी, कपडा और मकान’ यांसारखे देशभक्तिपर अनेक चित्रपट केले.

गाजलेले चित्रपट

मनोज कुमार यांनी ‘शहीद’ (1965), ‘उपकार’ (1967), ‘पूरब और पश्चिम’ (1970) आणि ‘रोटी, कपडा और मकान’ (1974) आणि ‘क्रांती’ यासह अनेक देशभक्तिपर विषय असलेल्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आणि काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. देशभक्तिपर चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी ‘हरियाली और रास्ता’, ‘वो काैन थी’, ‘हिमालय की गोद में’, ‘दो बदन’, ‘पत्थर के सनम’, ‘नील कमल’ यासारख्या इतर चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांचे चित्रपट देशभक्तिपर गीतांमुळेही लोकप्रिय झाले होते. त्यात ‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा…’, ‘मेरे देश की धरती…’ यासारख्या अनेक गीतांचा समावेश आहे.

मिळालेले पुरस्कार

मनोज कुमार यांना सात फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. पहिला फिल्मफेअर पुरस्कार 1968 मध्ये ‘उपकार’ चित्रपटासाठी मिळाला. ‘उपकार’ला सर्वोत्पृष्ट चित्रपट, सर्वोत्पृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्पृष्ट कथा आणि सर्वोत्पृष्ट संवाद असे चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. मनोज कुमार यांनी सुमारे 55 ते 60 चित्रपटांमध्ये काम केले होते. चित्रपट आणि कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हिंदुस्थान सरकारने 1992 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. 2015 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साईबाबांवर होती श्रद्धा

‘शिर्डी के साईबाबा’ (1977) हा मनोज कुमार यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक समजला जातो. या चित्रपटात मनोज कुमार यांनी भूमिका साकारली होती. यासोबत चित्रपटाची पटकथा तसेच ‘साईबाबा बोलो’, ‘साईनाथ तेरे हजारो हाथ’ ही दोन्ही गाणीदेखील मनोज कुमार यांनीच लिहिली होती.

दिलीप कुमार यांच्यामुळे मनोज हे नाव

मनोज कुमार लहानपणापासूनच दिलीप कुमार यांचे खूप मोठे चाहते होते. मनोज कुमार यांना दिलीप कुमार यांचा ‘शबनम’ (1949) हा चित्रपट इतका आवडला की, त्यांनी तो अनेक वेळा पाहिला. चित्रपटात दिलीप कुमार यांचे नाव मनोज होते. जेव्हा मनोज कुमार चित्रपटांमध्ये आले तेव्हा त्यांनी दिलीप कुमार यांच्या नावावरून त्यांचे नाव मनोज कुमार असे ठेवले. पुढे मनोज कुमार याच नावाने त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली.

शाहरुखवर शंभर कोटींचा मानहानीचा खटला

2007 साली शाहरुख खानचा ‘ओम शांती ओम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील एका सीनमध्ये शाहरुख मनोज कुमार यांची नक्कल करतो. चित्रपटातील हा सीन पाहून मनोज कुमार संतापले. त्यांनी शाहरुखवर 100 कोटींची मानहानीची केस दाखल केली. यानंतर सिनेमातला तो सीन डिलीट करून मनोज कुमार यांची माफी मागितली.

‘क्रांती’ चित्रपट बनवण्यासाठी घर विकले

1981 मध्ये प्रदर्शित झालेला ‘क्रांती’ हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक चित्रपटांमध्ये गणला जातो. हा चित्रपट प्रचंड हिट ठरला आणि प्रदर्शित होताच त्याने कमाईचे अनेक विक्रम मोडले. रिपोर्ट्सनुसार, मनोज कुमार यांनी हा चित्रपट बनवण्यासाठी जुहूमधील त्यांचे राहते घरही विकल्याचे म्हटले जाते. या चित्रपटासाठी त्यांनी दिल्लीतील आपले घरही विकले होते. सर्व अडचणी आणि आव्हानांना न जुमानता मनोज कुमार यांनी ‘क्रांती’ पूर्ण केला आणि सुमारे तीन कोटी रुपयांमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 16 कोटी रुपयांची मोठी कमाई केली होती.

आणीबाणीत सरकारला धारेवर धरले

मनोज कुमार एकमेव अभिनेते आहेत ज्यांनी सरकारविरुद्ध खटला दाखल केला आणि जिंकलासुद्धा होता. 1975 मध्ये जेव्हा इंदिरा गांधींच्या सरकारने देशात आणीबाणी लागू केली तेव्हा मनोज कुमार यांनी त्याचा विरोध केला होता. त्यावेळी आणीबाणीला विरोध करणाऱया कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित होताच सरकार त्यांच्यावर बंदी घालत होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मनोज कुमार यांच्या ‘दस नंबरी’ या चित्रपटावर बंदी घातली. तसेच दुसरा चित्रपट ‘शोर’ प्रदर्शित होण्यापूर्वीच दूरदर्शनवर दाखवला. त्यामुळे मोठे नुकसान झाले. संतप्त मनोज कुमार यांनी इंदिरा सरकारविरुद्ध खटला दाखल केला आणि तो खटला जिंकला होता. केस हरल्यानंतर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांना ‘इमर्जन्सी’वर चित्रपट बनवण्याची ऑफर दिली, पण त्यांनी ती ऑफर नाकारली, एवढेच नाही तर प्रसिद्ध लेखिका अमृता प्रीतम यांनाही या चित्रपटाची पटकथा लिहिल्याबद्दल त्यांनी फटकारले.

  • मनोज कुमार यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ते हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीचे एक आयकाॅन होते, जे त्यांच्या चित्रपटांमध्येदेखील दिसले. त्यांच्या कार्यांनी राष्ट्राभिमानाची भावना प्रज्वलित केली आणि पुढच्या पिढय़ांना प्रेरणा देत राहील. या दुःखाच्या प्रसंगी माझ्या भावना त्यांच्या कुटुंबीयांसह आणि चाहत्यांसह आहेत. – पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • ‘शहीद’ मध्ये भगतसिंग साकारून मनोज कुमार हे देशाला सुपरिचित झाले. त्यानंतर शेतीसारखा विषय त्यांनी चित्रपटातून हाताळला आणि ‘मेरे देश की धरती’सारखे गीत आजही प्रत्येक स्वातंत्र्यदिनाला त्याच अभिमानाने ऐकले जाते. चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणार नाही. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • मनोज पुमार म्हणजे हिंदुस्थानच्या चित्रपटसृष्टीचा गौरव. खऱया अर्थाने ते देशाचे रत्न होते. त्यांच्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकेने आपल्या हृदयावर राज्य केले. या चित्रपटांमधील गाणीदेखील कायम अजरामर राहतील. एक खरा देशभक्त त्यांनी चित्रपटांमध्ये अतिशय सुंदरपणे साकारला. या कठीण काळात त्यांचे कुटुंबीय, मित्र, चाहत्यांना हा धक्का पचवण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना. – शत्रुघ्न सिन्हा
  • मनोज कुमार यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला नशीबवान समजते. ते महान दिग्दर्शकांपैकी एक होते. चित्रपट उद्योगात त्यांचे योगदान मोलाचे आहे. चित्रपट आणि त्यातील गाणी कशी असावी, अशा चित्रपटांबद्दलच्या बऱयाच गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या होत्या.
  • मनोज कुमार आज आपल्यात नाहीत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली मला चार मोठ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. ‘संन्यासी’, ‘दस नंबरी’, ‘क्रांती’ आणि ‘संतोष.’ एक अद्भुत, प्रेमळ, मैत्रीपूर्ण व्यक्ती. अजरामर चित्रपट त्यांनी बनवले. त्यांच्या चित्रपटांना देशभक्तीचा स्पर्श असायचा. त्यामुळेच ‘भारत कुमार’ या नावाने ते ओळखले जायचे. त्यावेळचे दिग्दर्शक वेगळे होते. त्यांचा दृष्टिकोन वेगळा असायचा. मनोज पुमार त्यापैकीच एक. ते सर्व दृश्यांमध्ये सर्वोत्तम अँगल मिळवण्यासाठी दक्ष असायचे. त्यांची कथा आणि संवाद लोकांना आवडायचे. त्याकाळी प्रतिभावंत दिग्दर्शकांनी उत्पृष्ट कलाकृती घडवल्या. मनोज कुमार त्या दिग्दर्शकांपैकीच एक! अलविदा मित्रा! – भाजप खासदार हेमा मालिनी
  • ‘खूप गोष्टी आहेत. फिल्म इंडस्ट्रीचे सुरुवातीचे दिवस आम्ही एकत्र घालवले. खूप साऱ्या आठवणी आहेत,’ अशा शब्दांत धर्मेंद्र यांनी भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी मनोज कुमार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी धर्मेंद्र यांनी मित्राच्या आठवणींना उजाळा दिला.
  • मनोज पुमार माझे गुरू होते. मी त्यांच्यासोबत माझा पहिला चित्रपट ‘उपकार’ केला. मी त्यांच्या सर्वच चित्रपटांचा भाग होते. जर त्यांनी दहा चित्रपट केले, तर मी त्यापैकी किमान नऊ चित्रपटांमध्ये होते. मनोज कुमार एक उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता होते, पण उत्तम माणूस होते. त्यांच्या पत्नी शशी यादेखील खूप चांगल्या आहेत. शूटिंगदरम्यान त्यांची आम्हाला मदत व्हायची. कोणीही काळ आणि वयाच्या विरोधात जाऊ शकत नाही. मनोज कुमार बराच काळ आजारी होते. काही महिन्यांपूर्वी माझा पाय प्रॅक्चर झाला होता. मनोज कुमार ज्या रुग्णालयात होते त्याच रुग्णालयात मला दाखल करण्यात आले होते, पण माझ्या दुखापतीमुळे मी त्यांना भेटू शकले नाही.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘गल्ली गल्लीमध्ये राज ठाकरेंच्या पक्षासारखे पक्ष…’ सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं ‘गल्ली गल्लीमध्ये राज ठाकरेंच्या पक्षासारखे पक्ष…’ सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात बोलताना पुन्हा एकदा मराठी भाषेचा मुद्दा उपस्थित केला होता. बँक आणि इतर अस्थापनांमध्ये...
करुणा शर्माची ती दोन कागदपत्रे ठरली टर्निंग पॉइंट, धनंजय मुंडे यांना धक्का, पोटगी देण्याचा निर्णय कायम
‘एवढी मग्रुरी, एवढी मस्ती..’; दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा संताप, थेट सरकारला सवाल
कृषीमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून महायुतीचा नेता आक्रमक; थेट सरकारला सुनावलं
Photos: धनंजय मुंडेंची लेक आहे फॅशनेबल, वैष्णवी मुंडे सध्या काय करते?
बीडमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला
School Bus Accident – शाळेत जात असताना स्कूल बस नाल्यात कोसळली, 20 विद्यार्थी जखमी