बीडमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला

बीडमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुबियांची भेट घ्यायला मस्साजोग येथे आलेले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचाच फोन चोरीला गेला आहे. योगेश कदम यांनी केज पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. जिथे इतकी सुरक्षा यंत्रणा घेऊन फिरणाऱ्या मंत्र्यांचाच फोन सुरक्षित नाही तिथे सामान्य जनतेचे काय होणार, असा सवाल लोकांमधून केला जात आहे.

बीडचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा खास असलेला वाल्मीक कराड याचाही समावेश आहे. वाल्मी कराड याच्या सांगण्यावरून  विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे यांनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आऱोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई विमानतळावरून पावणे सात किलो सोने जप्त मुंबई विमानतळावरून पावणे सात किलो सोने जप्त
सोन्याचा भाव 96 हजारांच्या घरात असताना बँकॉकमधून आणलेले तब्बल पावणे सात किलो वजनाचे सोने मुंबई विमानतळावरून अंमलबजावणी व सक्तवसुली संचालनालयाने...
शिवसेना विक्रोळी विधानसभेतील अनंत पाताडे उपविभागप्रमुख पदावरून पदमुक्त
हैदराबादने पंजाबवर 8 गडी राखून मिळवला विजय, अभिषेकची शतकी खेळी
clove and rock sugar benefits: निद्राशयाच्या समस्या दूर करण्यासाठी स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ ठरेल प्रभावशाली…
उद्धव ठाकरेंचे पोस्टर फाडणाऱ्या ओंकार चव्हाणसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल
रायगडावर शिंदेंना भाषणाची संधी, अजितदादांना डावललं? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
‘कंडोम विकते…’ नुसरत भरुचाने सांगितला तो किस्सा, अभिनेत्री म्हणाली खूपच वाईट…