‘मी ड्रग्स ॲडिक्ट, सेक्स ॲडिक्ट पण कधीच…’, प्रसिद्ध कॉमेडियनने बलात्काराच्या आरोपांवर सोडलं मौन
ब्रिटिश पोलिसांनी शुक्रवारी कॉमेडियन रसेल ब्रँडवर बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप केला. चार महिलांनी केलेल्या लैंगिक छळाच्या तक्रारींनंतर 18 महिन्यांच्या चौकशीनंतर हे आरोप लावण्यात आले आहेत. लंडन मेट्रोपॉलिटन पोलिसांनी सांगितल्यानुसार, 50 वर्षीय ब्रँडवर बलात्काराचा, प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा, आणि लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मात्र, अभिनेत्याने आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित गुन्ह्यांमध्ये चार महिलांचा समावेश आहे आणि हे प्रकरण 1999 ते 2005 दरम्यान घडलं आहे. रिपोर्टनुसार, ही घटना सप्टेंबर 2023 मध्ये उघडकीस आली. काही वृत्त संस्थांनी चार महिलांनी रसेल यावर लावलेले आरोप समोर आणल्यानंतर कॉमेडियनच्या अडचणीत वाढ झाली आहे.
चार महिलांनी केलेले आरोप फेटाळत कॉमेडियन रसेल ब्रँडने स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत कॉमेडियन रसेल ब्रँड म्हणाला, ‘मी कायम तुम्हा सर्वांना सांगत आलो आहे. जेव्हा मी तरुण होतो तेव्हा मी एकटा होतो. माझी पत्नी आणि मुलांच्या आधी मी एकटा होतो. मी एक मुर्ख व्यक्ती होतो. मी ड्रग्स ॲडिक्ट आहे, मी सेक्स ॲडिक्ट आहे पण मी कधीच कोणाचा बलात्कार केला नाही. मी कधीही कोणत्याही गैर-सहमतीच्या कार्यात भाग घेतला नाही…’ असं म्हणत त्याने स्वतःची बाजू स्पष्ट केली.
कोण आहे रसेल ब्रँड
रसेल ब्रँड हा एक कॉमेडियन आणि अभिनेता आहे ज्याने रेडिओ आणि टेलिव्हिजनवर कार्यक्रम आयोजित केले आहेत. ब्रँड अनेक हॉलिवूड सिनेमांमध्ये देखील दिसला आहे आणि 2010 आणि 2012 दरम्यान पॉप स्टार कॅटी पेरीशी विवाह केला होता. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. सोशल मीडियावर देखील रसेल ब्रँडच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर रसेल कायम फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List