वयाच्या 7 व्या वर्षी घर सोडलं, कॉल सेंटरमध्ये काम केलं,अन् आज आहे इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक
टीव्ही इंडस्ट्री असो किंवा बॉलिवूड अभिनय क्षेत्रात काम करताना प्रत्येकाला मेहनत ही करावीच लागते. यात काहीजण यशस्वी होतात तर काहीजण निराश होऊन हे क्षेत्रच सोडून देतात. तसेच काहीजण हार न मानता जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मेहनत करत राहतात. अशीच एक अभिनेत्री आहे जिने अभिनय क्षेत्रात आपलं करिअर करण्यासाठी मेहनत तर केलीच पण यश मिळवण्याची जिद्दही ठेवली.एवढंच नाही तर या अभिनेत्रीने वयाच्या 7 व्या वर्षी घर सोडलं आणि आज ती इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे.
इंडस्ट्रीत येण्यापूर्वी मेहनत अन् स्ट्रगल
या अभिनेत्रीने लोकप्रिय शोमध्ये चांगल्या आणि वाईट भूमिका साकारल्या आहेत. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये करिअर करणे आणि नंतर चित्रपटांमध्ये नाव कमवणे हे सोपे काम नाही. पण तिने तेही करून दाखवलं. आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती आहे हिना खान. जिने सून या पात्रापासून ते नकारात्मक भूमिकेपर्यंत सर्व प्रकारच्या कामाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एवढंच नाही तर तिने सलमान खानने रिअॅलिटी शोमध्येही आपलं टॅलेंट दाखवलं आहे.
हिना खानचा जन्म 2 ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे झाला. मनोरंजन क्षेत्रात येण्यापूर्वी, तिने 2009 मध्ये गुडगावच्या सीसीए स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केलं. तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं की सुरुवातीला ती स्वतःचे खर्च भागवण्यासाठी कॉल सेंटरमध्ये काम करायची.
एक निर्णय आयुष्य बदलणारा
2008 मध्ये, हिना खानने ‘इंडियन आयडल’ साठी ऑडिशन देखील दिलं होतं आणि ती टॉप 30 मध्येही पोहोचली होती. परंतु त्यानंतर ती बाहेर पडली. दिल्लीतील कॉलेजच्या काळात, तिने एका मित्रांच्या आग्रहावरून ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ साठी ऑडिशन दिलं. हा निर्णय त्याच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरला कारण त्यामुळे तिचे अभिनय क्षेत्रात पाऊल पडले.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेद्वारे अक्षरा या पात्रातून ती घराघरात ओळखली जाऊ लागली. 8 वर्ष या शोचा भाग राहिल्यानंतर, तिने नवीन काहीतरी करण्याच्या विचाराने अखेर हा शो सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हिनाने बिग बॉस 11 च्या सिझनमधून सर्वांची मने जिंकली.
बॉलिवूड करिअरला एक नवीन दिशा मिळाली
त्यानंतर हिना खानने एकता कपूरच्या ‘नागिन 5’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. हिना खानने Hacked ‘हॅक्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. विक्रम भट्ट दिग्दर्शित हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला नसला तरी हिना खानचे कौतुक नक्कीच झालं.त्यानंतर तिने ‘अनलॉक’, ‘सोलमेट’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करून तिच्या बॉलिवूड करिअरला आणखी एक नवीन दिशा दिली.
करोडोची संपत्ती
हिना अलीकडेच ‘कंट्री ऑफ ब्लाइंड’ मध्ये दिसली, ज्याचा प्रीमियर 6 ऑक्टोबर रोजी अमेरिकेत झाला आणि तिला ऑस्कर लायब्ररीमध्ये आमंत्रित करण्यात आलं, ज्यामुळे जागतिक चित्रपटसृष्टीत तिची उपस्थिती आणखी महत्वाची झाली. एका रिपोर्टनुसार हिना खानची एकूण संपत्ती 52 कोटी रुपये आहे, ज्यामुळे ती भारतातील सर्वात श्रीमंत टीव्ही अभिनेत्री असल्याचं म्हटलं जातं.
हिना खान ही टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी प्रत्येक भागासाठी 2 लाख रुपये घेते. कामाबद्दल बोलायचं झालं तर, हिना खान ‘कहार’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. तसेच ती सध्या कॅन्सर या आजारासाठी उपचार घेत असली तरी खचून जाता जिद्दीने काम करताना दिसत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List