अभिनेत्री सासरी पोहोचताच सासूबाईंना उचलली चप्पल, लग्न करून स्वतःच्याच पायावर मारली कुऱ्हाड

अभिनेत्री सासरी पोहोचताच सासूबाईंना उचलली चप्पल, लग्न करून स्वतःच्याच पायावर मारली कुऱ्हाड

Bollywood Actress Love Life: झगमगत्या विश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिल्या. प्रेम, ब्रेकअप, लग्न घटस्फोट… यांमुळे अनेक अभिनेत्रींचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. आयुष्या आलेल्या संकटातून काही अभिनेत्रींनी स्वतःला सावरलं तर, काहींनी मात्र झगमगत्या विश्वाचा निरोप घेतला. पण सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने खासगी आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला.

बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांना डेट केलं. पण अभिनेत्रीच्या नशिबी वैवाहिक आयुष्याचं सुख कधी आलंच नाही. प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न केल्यानंतर सासरी पोहोचताच अभिनेत्रीचं स्वागत सासूबाईंनी चपलीने केलं. सध्या ज्या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री रेखा आहेत.

महानायक अमिताभ बच्चन यांच्यानंतर रेखा यांच्या नावाची चर्चा अभिनेते विनोद मेहरा यांच्यासोबत रंगू लागली. एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न देखील केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. विनोद मेहरा आणि रेखा यांच्या नात्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे… तर आज दोघांच्या रिलेशनशिपबद्दल जाणून घेवू…

बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांचं विनोद मेहरासोबत अफेअर होतं. रेखा आणि विनोद मेहरा यांच्या अनेक फोटोंचीही चर्चा झाली. रेखा आणि विनोद मेहरा यांनी एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. रेखा आणि विनोद मेहरा यांच्या लग्नाची बातमी समोर येताच सर्वांनाच धक्का बसला.

रेखा आणि विनोद मेहरा यांनी जितक्या लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, तितक्याच लवकर त्यांच्या नात्याचा अंत देखील झाली. रेखा आणि विनोद मेहरा यांचे लग्न फक्त दोन महिनेच टिकलं. रेखासोबत लग्न केल्यानंतर विनोद मेहरा यांच्या आई आनंदी नव्हत्या.

रेखा यांच्यासोबत मुलगा विनोद यांचं नातं त्यांच्या आईला मान्य नव्हतं. म्हणून रेखा सासरी पोहोचताच विनोद मेहरा यांच्या आईने या लग्नाला विरोध देखील केला. लग्नानंतर रेखा जेव्हा पहिल्यांदा सासरी पोहोचल्या तेव्हा त्यांना मारण्यासाठी मेहरा यांच्या आईने चक्क चप्पल हातात घेतली होती. यावर रेखा म्हणाल्या होत्या, ‘माझे आणि त्यांच्या आईचे विचार भिन्न होते. त्या मला बदनाम अभिनेत्री समजत होत्या…’ असं देखील रेखा एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर
कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांत जवळपास 5.8 लाख कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये कंपन्यांनी 2...
हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले 
वैष्णोदेवी दर्शनासाठी आता थेट फ्लाईट
हिंदुस्थान-फ्रान्स नौदलाचा अभ्यास
धक्कादायक! ओडिशात रोज 3 बालविवाह
नौदलात 29 मार्चपासून अग्निवीर पदांची भरती
कुवेतमध्ये 42 हजार जणांचे नागरिकत्व धोक्यात