कहते है इसको तानाशाही, देश मे इतनी महंगाई, सरकार के साथ है आई; कुणाल कामराचा आणखी एक व्हिडीओ, सरकारच्या धोरणांचे काढले वाभाडे
स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. देश मे इतनी महंगाई, सरकार के साथ है आई…, अशा शब्दांत कुणाल कामराने सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. व्हिडिओमध्ये पॉपकॉर्नचे इमोजी लावत कुणाल कामराने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची खिल्ली उडवली आहे. सरकारला काही फरक पडत नाही. तुमच्या आपेक्षा कचऱ्याच्या डब्यात गेल्या. कॉर्पोरेटमधील कर्मचारी हा कॉर्पोरेटपेक्षाही जास्त कर भरतोय. हे देशहितात होत आहे, अशी सडकून टीका कुणाल कामराने व्हिडिओतून केली आहे.
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 26, 2025
‘ठाणे की रिक्षा… चेहरे पे दाढी… आंखो पे चष्मा, हाये…’ हे गद्दार गीत मिंधे गटाला झोंबल्याने तोडफोड करण्यात आली. धमक्या देण्यात आल्या. या धमक्यांना कुणाल कामराने भीक घातली नाही. त्याने हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन, मन में हैं अंधविश्वास, देश का सत्यानाश… अशा खरमरीत शब्दांत टीका केली. देश मे इतनी महंगाई, सरकार के साथ है आई, असे म्हणत त्याने टीका केली आहे.
इन सकडो की बरबादी करने सरकार ये आई
मेट्रो है इनके मन मे, खोद कर ले अंगडाई
ट्रॅफिक बढाने ये है आई, ब्रिजेस गिराने ये है आई,
कहते है इसको तानाशाही…
देश मे इतनी महंगाई, सरकार के साथ है आई
लोगो की लुटने कमाई, साडीवाली दीदी आई
सॅलरी चुराने ये है आई, मिडल क्लास दबाने ये है आई…
पॉपकॉर्न खिलाने ये है आई, कहते है इसको निर्मलाताई…
हम होंगे कंगाल… देश का सत्यानाश, माफी नाही… पुढचा शो एल्फिन्स्टन ब्रीजवर; कुणाल कामराने पुन्हा चोपले
दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये गाणं संपल्यानंतर कुणाल कामराने निर्मला सितारामन यांना पुन्हा टिकेचं लक्ष्य केलं. निर्मला सितारामन या जेएनयूच्या विद्यार्थी होत्या. चुकीच्या विद्यापीठात त्या शिकल्या. बनारस हिंदू विद्यापीठात शिकल्या असत्या तर चांगल्या अर्थमंत्री झाल्या असत्या, असा टोला कुणाल कामराने व्हिडिओमधून लागावला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List