खोक्या, बोक्या आणि ठोक्या सगळ्यांना ठोकणार! फडणवीस दिल्लीत म्हणाले
बीड जिह्यातील भाजप कार्यकर्ता खोक्या ऊर्फ सतीश भोसले याच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली. यासंदर्भात दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो, कुणालाच सोडणार नाही, सर्वांनाच ठोकून काढणार, अशा शब्दांत इशारा देत राज्यात गुन्हेगारीला थारा दिला जाणार नाही, असे सांगितले.
आमदार धस यांना सूचक इशारा
खोक्या हा भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय आहे. धस यांच्यासोबतचे त्याचे फोटो आणि दोघांमधील संभाषण व्हायरल झाले होते. खोक्या भोसले प्रकरणात कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत फडणवीस यांनी धस यांनादेखील सूचक इशारा दिल्याची चर्चा आहे.
खोक्याचा बोका शोधा – वडेट्टीवार
आकाचा आका शोधला, आता खोक्याचा बोका शोधा. पोलिसांना सोयीचा माणूस सापडतो. मात्र, गैरसोयीचा सापडत नाही. खोक्यामागचे बोके कोण आहेत तेही समजले पाहिजे. हे खोके कुठून येतात, सोन्याचा खजाना कुठून येतो, त्याला कोणाचा आशीर्वाद आहे हे सर्व शोधून काढा, असे कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List