इतकचं असेल तर तुमच्या आया-बहिणींचे व्हिडीओ बघा, Casting Couch व्हिडीओ लीकमुळे अभिनेत्रीचा संताप
चित्रपटसृष्टी म्हटलं की अनेकांना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो. मात्र याबाबतच्या बातम्या क्वचितच सामान्य जनतेपर्यंत पोहोचतात. सध्या कास्टिंग काऊचचे प्रमाण तमिळ इंडस्ट्रिट वाढलेले दिसत आहे. याबाबत अनेक अभिनेत्रींनी स्वत: हून यावार भाष्य केलंय. मात्र आता एका तमिळ अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचचा व्हिडीओ लीक झाल्याचे वृत्त आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
श्रुति नारायणम असे त्या तमिळ अभिनेत्रीचे नाव आहे. श्रुति चा कास्टिंग काऊचचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे ती प्रचंड संतापली आहे. तिने नेटकऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. श्रुती नारायणमने इंस्टाग्राम स्टोरीवर दोन पोस्ट पोस्ट केल्या आहेत. ‘तुम्हा लोकांसाठी, माझ्याबद्दल हे सर्व पसरवणे हा फक्त एक विनोद आणि मजेदार गोष्ट झाली आहे.’ पण माझ्यासाठी आणि माझ्या जवळच्या लोकांसाठी ही खूप कठीण परिस्थिती आहे. हा काळ विशेषतः माझ्यासाठी खूप कठीण आहे आणि तो हाताळणे मला फार कठीण जात आहे, असे तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘मी देखील एक मुलगी आहे आणि मलाही भावना आहेत आणि माझ्या जवळच्या लोकांनाही भावना आहेत. तुम्ही लोक हे सगळं आणखी वाईट पद्धतीने मांडत आहात. मी तुम्हा सर्वांना नम्रपणे विनंती करते की अशा गोष्टी आगीसारख्या पसरवू नका. तुमच्या आई, बहिणी किंवा मैत्रिणीचे व्हिडिओ पहा. कारण त्या देखील मुली आहेत आणि त्यांचे शरीर देखील माझ्यासारखेच आहे म्हणून जा आणि त्यांच्या व्हिडिओंचा आनंद घ्या, असा संताप तिने व्यक्त केला आहे.
श्रुतिचे व्हिडीओ पाहून लोक तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. यासाठी तिने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘हे एका व्यक्तीचे जीवन आहे, तुमचे मनोरंजन नाही.’ मी आतापर्यंत अनेक वाईट कमेंट्स आणि पोस्ट पाहिल्या आहेत. पण मला पुरुषांना विचारायचे आहे की असे का होते? नेहमी एखाद्या महिलेलाच का जज केले जाते. व्हिडिओ लीक करणाऱ्या आणि पाहणाऱ्यांना कोणीही प्रश्न विचारत नाही. व्हायरल व्हिडीओवर लोक ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत ते घृणास्पद आहे, असे ती म्हणाली.
सर्व महिलांचे शरीराचे अवयव सारखेच असतात, जसे की तुमची आई, आजी, बहीण किंवा पत्नी. ही काही मोठी गोष्ट नाही. हा फक्त एक व्हिडिओ नाहीये, तर तो एखाद्याच्या मानसिकतेचा आणि आयुष्याचा प्रश्न आहे. एआय-जनरेटेड डीपफेक लोकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत. शेअर करणे थांबवा, लिंक्स मागणे थांबवा. माणूस बनायला सुरुवात करा.लीक झालेला व्हिडिओ शेअर करणे हा गुन्हा आहे. मग तो खरा असो किंवा डीपफेक, असे म्हणत श्रुतिने नेटकऱ्यांना सुनावले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List