Latur Crime News – देवणी तालुक्यात तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
देवणी तालुक्यातील बोंबळी येथे एक धक्कादाय़क घटना घ़डली. एका तरूणाने तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला. याप्रकरणी महिला बालअत्याचार कायद्या अंतर्गत देवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
देवणी तालुक्यातील बोंबळी येथे एका तरूणाने तीन अल्पवयीन मुलींसोबत अश्लिल वर्तन केले. या तिघींना तुम्हाला थंडा देतो म्हणनू आपल्या दुचाकीवर बसवून शेतात घेऊन गेला. शेतात गेल्यानंतर मोबाईलवरील अश्लील व्हीडिओ दाखवून त्या अल्पवयीन मुलींसोबत अश्लील कृत्य केले. यासोबतच जर घडलेल्या प्रकाराबाबत कोणालाही माहिती दिली तर तुम्हाला मारून टाकेन, अशी धमकीही त्या नराधमाने दिली.
दरम्यान, या घटनेमुळे मुली प्रचंड घाबरल्या होत्या. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. यानंतर वडिलांनी पोलिसात जाऊन तक्रार दिली. 27 मार्च रोजी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. सध्या या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण डप्पडवाड व पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौड करीत आहेत.
दरम्यान या घटनेमुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. तालूक्यात वारंवार अशा घटना घडत आहेत .गुन्हे दाखल होऊनही प्रशासन व्यवस्था कमालीची सुस्त व व्यस्त असल्याने सामाजिक सालोखा व सुरक्षितता धोक्यात आली असल्याची खंत महिलां वर्गातून व्यक्त आहे .
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List