Photo – सरावाला ब्रेक अन् रंगांची मुक्त उधळण, विदेशी खेळाडूंनीही केली धम्माल मस्ती
आयपीएलचा 18 वा हंगाम अवघ्या काही दिवसांपूर्वी येऊन ठेपला आहे. 22 मार्च पासून तोडफोड फलंदाजीला आणि चौकार षटकारांच्या आतषबाजीला सुरुवात होणार आहे.
पहिला सामना गतविजेते कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयच चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यामध्ये ऐतिहासिक इडन गार्डनवर रंगणार आहे.
आयपीएलची ट्रॉफी उंचावण्यासाठी सर्वच संघांनी कंबर कसून सरावाला सुरुवात केली आहे.
याच दरम्यान होळीचे औचित्य साधत सरावाला थोडा ब्रेक देत खेळाडूही रंगांमध्ये नाहून निघाले आहेत. कोलकाताचा मराठमोळा कर्णधार अजिंक्य राहणेने मनसोक्त रंगांची उधळण केली.
कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्सच्या सर्वच खेळाडूंनी रंगांची उधळण करत धूलिवंदनचा आनंद घेतला.
परदेशी खेळाडूंनी सुद्धा मोठ्या उत्साहात एकमेकांना रंग लावून सण साजरा केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List